17 April 2025 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

सुशांतसिंहच्या मृत्यूचं सत्य सीबीआयकडूनही गुलदस्त्यात | राज्याला बदनाम करणारे विरोधकही मूग गिळून शांत

Sushant Singh Rajput suicide

मुंबई, १४ जून | मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये बॉलिवू़ अभिनेता सुशांतसिंग राजपूतयाचा मृतहेह वांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. त्याच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीसह राजकारणीही हळहळले. यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास सुरु झाला. ही हत्या होती की आत्महत्या यावरुन राजाकराण सुरु झालं. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासावरून ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ पोलीस असा सामना रंगला. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीचे षड्‌यंत्र राबविल्याचे समोर येताच, आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण तापले. मात्र, वर्षभरानंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

गेल्या वर्षी १४ जूनला अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्याचे वडील, बहिणी यांचे जबाब नोंदवले हाेते. सुशांतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली. दरम्यान, ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. इतकंच नाही तर सुशांतसिंगची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिलाही अटक करण्यात आली होती.

सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांचा तपास थांबला आहे. अशात, मुंबई पोलीस, बिहार पोलीस, ईडी, एनसीबी आणि सीबीआय या पाच यंत्रणांनी तपास करूनही वर्षभराने सुशांतने आत्महत्या केली, की त्याची हत्या झाली? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे तपासासाठी असल्याने पुढे सीबीआय काेणत्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूला वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं या प्रकरणाची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील राजकारण ढवळून काढणारं हे प्रकरण सीबीआयनं हाती घेतल्यानंतर सुरुवातीला सनसनाटी निर्माण झाली होती. मात्र, सीबीआय अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत आलेली नाही. यावरून काँग्रेसनं शंका उपस्थित केली आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष होत आहे. सीबीआयनं या प्रकरणाची चौकशी हातात घेऊन ३१० दिवस उलटले आहेत. ‘एम्स’च्या पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढून २५० दिवस झाले आहेत. असं असताना सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगणार आहे? सीबीआयनं सत्य लपवून का ठेवलं आहे?,’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ‘सुशांत प्रकरणात सीबीआयवर प्रचंड दबाव आहे,’ असा स्पष्ट आरोपही त्यांनी केला आहे.

 

News Title: Sushant Singh Rajput suicide case even not reveled by CBI too after long since investigation was transferred news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या