15 January 2025 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
x

Taarak Mehta Ka Ooltah Chasma | तारक मेहतामधील टप्पूच्या आईने केली लगीनघाई, लवकरच करणार मुलाचं स्वयंवर

Taarak Mehta Ka Ooltah Chasma

Taarak Mehta Ka Ooltah Chasma | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने चाहत्यांचं आतापर्यंत भरपूर मनोरंजन केलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःबद्दलची एक वेगळी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात कोरली होती. एक कौटुंबिक, पारंपारिक आणि सामाजिक असणारी ही मालिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीच उतरली.

दरम्यान या सुप्रसिद्ध मालिकेतील एक अवली कलाकार म्हणजे टप्पू उर्फ राज अदानकट हा छोट्या पडद्यावरील कलाकार लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा साध्यासुध्या नसून बबीता आणि राज एकमेकांबरोबर लग्न करणार की नाही असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.

राजची आई लवकरच करणार त्याचं स्वयंवर :
राजने एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्याची आई लवकरच त्याचं स्वयंवर करणार आहे. दरम्यान राजने आपल्याला कशी मुलगी हवी आहे याचा देखील उलगडा मुलाखतीत केला आहे. राज्याच्या लग्नाची बातमी कळताच अनेकजण बबीता आणि राजच्या लग्नाबाबत विचार करत आहेत. राज आणि बबीतामध्ये भरपूर वर्षांचं अंतर असलं तरीसुद्धा, मालिकादरम्यान दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर अनेक वेळा रंगल्या आहेत.

बबीता आणि राजने एकमेकांबद्दल केलं असं वक्तव्य :
बबीताच खरं नाव मुनमुन दत्ता असं असून तिला मुलाखतीदरम्यान राज आणि तिच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा या सर्व केवळ अफवा आहेत असं सांगून तिने प्रश्नचिन्हांना पूर्णविराम दिला होता. परंतु राजला दोघांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की,’मला मुनमुनबद्दल काही बोलायचं नाही मला केवळ माझ्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे. ज्यावेळी माझ्या पर्सनल आयुष्यात काही घडेल तेव्हा मी सर्वांना नक्कीच सांगेल’. अशा पद्धतीचं वक्तव्य अभिनेता राज याने केलं.

सध्या ‘राज युनायटेड स्टेट ऑफ गुजरात’ या नाटकासाठी काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा सोशल मीडियावर भरपूर मोठा चाहतावर्ग देखील आहे. यंदाच्या नवरात्री उत्सवात राजने काही कार्यक्रमांमध्ये देखील हजेरी लावली होती. यादरम्यान से बरेच व्हिडिओ त्याने त्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट देखील केले आहेत

Latest Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chasma 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Taarak Mehta Ka Ooltah Chasma(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x