23 December 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH
x

VIDEO | अँड ऑस्कर गोज टू | मोदींची चित्रपट क्षेत्रातूनही फिरकी

Ram Gopal Varma

नवी दिल्ली, २३ मे | पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरातील जिल्हाधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्सं यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधत आहेत. याच एक भाग म्हणून मोदींनी शुक्रवारी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. यावेळी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.

मात्र देशातील अनेक विषय जेव्हा मोदी सरकारच्या अंगलट आले किंवा जेव्हा एखादा विषय चर्चेचा ठरला तेव्हा मोदी भावुक झाल्याचं देशवासीयांनी अनेकदा अनुभवलं आहे. त्यामुळे मोदी हे सर्व ठरवून ड्रॅमेबाजी करतात अशी ठाम भूमिका भारतीय समाज माध्यमांवर व्यक्त करत आहेत. केवळ राजकीय नव्हे तर सर्वच थरातून मोदींवर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे भाजपची अजूनच कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवताना, बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी ऑस्कर सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. हा एक एडिटेड मॉर्फ व्हिडिओ आहे. या व्हिडिओत अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स ऑस्कर विजेत्याचे नाव घोषित करत असते. यावेळी मोदींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील भावूक भाषणाची झलक दाखवण्यात आली आहे आणि त्यानंतर तो ऑस्कर पुरस्कार मोदींनाच मिळतो, असे दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओच्या शेवटी अभिनेत्री जेनिफर “अँड ऑस्कर गोज टू”, असे म्हणते आणि त्यानंतर स्क्रिनवर ऑस्कर पुरस्कार घेतलेले ‘एडिटेड’ मोदी दिसतात आणि सभागृहातील लोक टाळ्या वाजवतात.

 

News English Summary: While mocking Prime Minister Narendra Modi, Bollywood director Ram Gopal Varma has shared a video clip of the Oscar ceremony. This is an edited morph video. In this video, actress Jennifer Lawrence announces the name of the Oscar winner. This time, a glimpse of Modi’s emotional speech in video conferencing is shown and after that, it is shown that Modi gets the Oscar award.

News English Title: THE BEST OSCAR EVER said by Bollywood film director Ram Gopal Varma news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x