23 November 2024 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो

India corona pandemic

नवी दिल्ली, १५ मे | देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात स्मशान भूमीत २-३ दिवसांचा वेटिंग लागत असल्याने कोरोना प्रेतातून दुर्गंधी पसरत असल्याचं देखील समोर आलं आहे. परिणामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांचे नातेवाईक धक्कादायक मार्ग स्वीकारून स्वतःला मोकळे करत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहार मधील गंगा नदीत जवळपास १०० मृत कोरोना बॉडी फेकल्याचं आढळून आलं आहे आणि अगदी तसाच प्रकार उत्तर प्रदेशातील गंगा नदीत देखील पाहायला मिळाला होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला घाम फुटला आहे.

दुसरीकडे, कोरोना काळातील सर्वात मोठी स्मशानभूमी उन्नावमध्ये असल्याचे दिसून येत आहे. कारण येथीलच शुक्लगंज घाट आणि बक्सर घाटाजवळ 900 हून अधिक मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. दरम्यान, तेथे प्रत्येक चरणात मानवी अवयव विखुरलेले दिसतात. सध्या घाई गडबडीत सर्व मृतदेहांना वाळूत पुरुन टाकण्याचं काम सुरु आहे. विशेष म्हणजे धर्माने हिंदू असलेल्या रुग्णांचे अग्निदहन होण्याऐवजी त्यांना दहन करण्याची वेळ आल्याने मोठ्या प्रमाणावर संताप देखील व्यक्त होताना दिसत आहे.

दरम्यान, नेहमीच विवादित वक्तव्यांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. गंगेत वाहून येत असलेले मृतदेह हे भारतातील नसून ते नायजेरियाचे असल्याचा जावईशोध कंगनाने लावला आहे. कंगनाच्या या अजब तर्कटावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कंगना रनौतला ट्विटरवर बॅन करण्यात आल्याने ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. नुकतीच तिने चाहत्यांना ईद आणि अक्षय तृतियाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच सर्वांनी एकत्र राहून कोरोनाविरुद्धची लढाई लढण्याचं आवाहनही केलं आहे. तिने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यातून तिने हे आवाहन केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

News English Summary: Famous actress Kangana Ranaut has once again made a controversial statement due to her always controversial statements. According to Kangana, the bodies being transported in the Ganges are not from India but from Nigeria. Kangana’s strange logic is being questioned.

News English Title: The photo gone viral on social media of dead bodies floating in Ganga are from Nigeria said Kangana Ranaut news updates.

 

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x