18 January 2025 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

थिएटर मालकांकडून केंद्र सरकारकडे नियमावली सादर, अनलॉक ३ मध्ये चित्रपटगृहांना सूट मिळणार?

Theater association, code of conduct, Guidelines, Union government, Unlock 3

नवी दिल्ली, २५ जुलै : देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा कळस गाठत आहे. गेल्या २४ तासांत 48,916 नव्या रुग्णांची भर पडली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या २४ तासांत ७५७ रुग्णांचे निधन झाले आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 13,36,861 वर पोहोचला आहे. यामध्ये 4,56,071 एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 8,49,431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, देशभरात 31,358 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

देशातील करोना रुग्णांची संख्या तीन आठवडय़ांमध्ये दुप्पट झाली आहे. २ जुलै रोजी रुग्णसंख्या सुमारे सहा लाख होती. गेल्या ४८ तासांमध्ये सुमारे एक लाख रुग्णांची भर पडली आहे. जगभरात करोनामुळे झालेल्या सर्वाधिक मृत्यूंच्या क्रमवारीत फ्रान्सला मागे टाकून भारत सहाव्या स्थानी आला आहे. असे असले तरी जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर नीचांकी २.३८ टक्के आहे. १० लाख लोकसंख्येमागे ८६४ लोकांना करोनाची बाधा झाली असून २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 25 मार्चपासून देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील सुमारे 70 ते 80 हजार चित्रपटगृहे बंद आहेत. चित्रपटगृहांना दरमहा दीड ते 2 हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. त्यापैकी मल्टिप्लेक्स थिएटर्स दरमहा एक हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. म्हणूनच मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारला आपण फिजिकल डिस्टन्ससिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यास तयार असल्याची हमी दिली आहे. त्यांनी चित्रपटगृहांसाठी एक विशेष नियमावली तयार केली असून ती केंद्र सरकारला सादर केली आहे. मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता “अनलॉक 3” मध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये चित्रपटगृहांना सुरू करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये आणि चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना पेपरलेस तिकिटे दिली जातील, चित्रपटगृहांमधील आसनांमध्ये योग्य ते अंतर ठेवले जाईल, मल्टीप्लेस मध्ये फक्त दोनच स्क्रीनवर दोनच चित्रपट दाखविले जातील, चित्रपट प्रदर्शनाच्या काळात वेगवेगळ्या वेळी मध्यांतर ठेवले जाईल, त्यामुळे दोन स्क्रीनचे प्रेक्षक एकत्र येणार नाहीत आणि गर्दी होणार नाही, तर मध्यांतर पंधरा मिनिटांचे किंवा अर्धा तासाचेही असू शकतात, या काळात संपूर्ण चित्रपटगृह तसेच थिएटरच्या लॉबीचा भाग स्वच्छ करता येईल येईल, तसेच जिने व लिफ्टमध्ये सॅनिटाययजेशन केले जाईल, रेलिंग स्वच्छ केले जातील, प्रेक्षकांनी हातावर सैनिटायझर घेण्यासाठी गर्दी करू नये म्हणून टच स्क्रीन सैनीटायझर मशीन उपलब्ध असतील, दिवसातून अनेक वेळा संपूर्ण चित्रपट गृहे आणि लॉबी व जिने स्वच्छ केले जातील, अशी नियमावली या मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने तयार केली आहे.

 

News English Summary: The Multiplex Association of India has assured the Central Government that it is ready to abide by all the rules of physical distance. He has prepared a special regulation for cinemas and submitted it to the Central Government.

News English Title: Theater association submitted code of conduct to union government before unlock 3 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x