23 February 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

VIDEO | हेल्मेट व मास्क न घालता बाईक चालवली | विवेक ओबेरॉयवर गुन्हा दाखल

Traffic police, Bollywood actor Vivek Oberoi, Traffic rules

मुंबई, २० फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय विरुध्द वाहतूक नियमांनुसार ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली आहे. विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईक चालवल्याने विवेकला दंड ठोठावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विवेक ओबेरॉयने हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ. बीनु वर्गीस यांनी मुंबई पोलिसांना ट्विटर करून केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.

विवेक ओबेरॉयने स्वतः 14 फेब्रुवारी रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो हेल्मेटशिवाय तसेच मास्क न घालता दुचाकी चालवताना दिसला होता. विवेकला 500 रुपयांचे ई-चलान पाठवण्यात आलं आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याच्याविरुध्द मुंबई पोलिसांनी आयपीसीच्या कलम 188, 269, मोटार वाहन कायद्याच्या कलम 129, 177 आणि साथीच्या कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

“विवेकने विनाहेल्मेट बाईक चालवून वाहतूक सुरक्षा नियम मोडला आहे, तसेच त्याने चेहऱ्यावर मास्क देखील घातलेले नाही…याद्वारे युवा पिढीसमोर चुकीचा संदेश जातो, त्यामुळे त्याला दंड आकारावा” असं वर्गीस यानी लिहिलं होतं. बाईक राईडचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर विवेक ओबेरॉय विरोधात ट्रॅफिक पोलिसांनी ट्रॅफिकच्या नियमांतर्गत ही कारवाई केली आहे. विवेकला 500 रुपयांचे ई-चलान मोबाईलवर पाठवण्यात आलं आहे.

 

News English Summary: Traffic police have taken action against Bollywood actor Vivek Oberoi as per traffic rules. Vivek has been fined for riding a bike without a helmet and without a mask. According to the information received, on Friday, Vivek Oberoi complained that he was riding a bike without a helmet. Binu Varghese had tweeted to Mumbai Police. After that, Mumbai Police took this action.

News English Title: Traffic police have taken action against Bollywood actor Vivek Oberoi as per traffic rules news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x