16 April 2025 6:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

प्रसिद्धीची संधी मिळताच तृप्ती देसाई यांचा हेमांगी कवीच्या पोस्टवर प्रतिप्रश्न? - काय म्हणाल्या?

Trupti Desai

मुंबई, १४ जुलै | महिलांच्या अंतर्वस्त्रांवर लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून अभिनेत्री हेमांगी कवी सध्या चर्चेत आहे. तिने ब्रा आणि त्यावर पुरुषांच्या दृष्टीकोनावर लिहिलेल्या या पोस्टवर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सुद्धा एक सोशल मीडिया पोस्ट करून त्याखाली हेमांगीची पोस्ट शेअर केली. परंतु, तिच्या विचारांचे समर्थन करत असतानाच आधी का आवाज उठवला नाही असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला. जेव्हा आम्ही मंदिरात महिलांचा प्रवेश, मासिक पाळी आणि महिलांच्या ड्रेस कोडवर आवाज उठवला तेव्हा तू कुठे होतीस? असा प्रश्न देसाई यांनी विचारला आहे.

उशीरा का होईना धाडस तरी केले?
तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले, “सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही…” “त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे , सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे.परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिक बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले.

पुढे त्यांनी म्हटलंय कि, “परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी यांनी…. “जेव्हा महिलांना मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो ,अनेक ठिकाणी बंदी घातली जाते याविषयीही आम्ही कृतीत आंदोलने केली परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही.” “इंदुरीकर तर जाहीरपणे महीलांच्या वेशभूषा वर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असत त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो?” असो उशिरा का होईना परंतु धाडस करून लिहायला तरी सुरुवात केली “हे ही नसे थोडके”.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Trupti Desai reaction over Marathi movie actress Hemangi Kavi Facebook post news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Social(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या