15 January 2025 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट

Upcoming Movies

Upcoming Movies | चित्रपट प्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे. बॉलीवुड सिने विश्वातील एक नाही तर तब्बल चार चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटांची कमाल म्हणजे या सर्व चित्रपटांमध्ये नावाजलेले कलाकार झळकणार आहेत.

स्वतःच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संजय दत्त, श्रद्धा कपूर, जॉन इब्राहिम, अक्षय कुमार यांसारखे बेधडक अभिनेते नव्या अंदाजातील नवे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाले आहेत. दरम्यान या सर्व कलाकारांचा मोठा चाहतावर्ग असून, एकाच दिवशी नेमका कोणता चित्रपट पहावा? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. चला तर जाणून घेऊया या चित्रपटांविषयी माहिती.

बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता ‘अक्षय कुमार’ ‘खेल खेल हे’ या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह अभिनेत्री तापसी पन्नू, अपारशक्ती खुराना, वाणी कपूर, एमी विर्क, प्रज्ञा जयस्वाल, फरीद खान आणि आदित्य सील हे सहकलाकार देखील झळकणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचा या सर्व कलाकारांसह एक पोस्टर सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा ‘स्त्री’ चा सिक्वल ‘स्त्री 2’ हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांत पाहायला मिळणार आहे. श्रद्धा चा हा रोमांचक आणि हॉरर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग अतिशय उत्सुक झाला आहे. सोबतच या चित्रपटामध्ये अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांसारखे सह कलाकार देखील आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

संजय दत्तचा ‘डबल स्मार्ट’ हा नवा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट 2019 सालच्या ‘इस्मार्ट’ या तेलगू चित्रपटाचा सिक्वल असल्याचं समजतंय. अशातच पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून बानी जे, काव्या थापर, अली, गेटअप श्रीनु, मकरंद देशपांडे, सयाजी शिंदे यांसारखे सहकलाकार लाभले आहेत. या चित्रपटाचा पोस्टर पाहूनच चमकतय की, ही फिल्म पूर्णपणे ॲक्शनबाज फिल्म असणार आहे. आतापर्यंत संजय दत्तच्या प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान हा चित्रपट पाहण्यासाठी देखील संजयचे फॅन उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

निखिल आडवाणी दिग्दर्शत ‘वेदा’ हा चित्रपट देखील 15 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटांमध्ये जॉन इब्राहिमसह तमन्ना भाटिया आणि अभिनेत्री शरवरी देखिल झळकणार आहे. जॉनचा ‘मन्या सुर्वे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच मनपसंतीस उतरला होता. ‘वेदा’ या चित्रपटामध्ये देखील जॉनचा तसाच काहीसा लुक पोस्टरवर पाहायला मिळतोय. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Upcoming Movies release on 15 august 2024.

हॅशटॅग्स

#Upcoming Movies(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x