22 February 2025 3:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Viral Video | दया कुछ तो गड़बड़ है! भाजपमध्ये बंड होणार? स्वतः मोदींनी समोरून नमस्कार करूनही गडकरींनी भाव दिला नाही

Viral Video

Viral Video | आगामी लोकसभा निवडणुका मोदी सरकारसाठी अवघड असतील असे सर्व्हे समोर आले आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांचा प्रसिद्धीचा आलेख वरती जातं असताना मोदी यांच्या बाबतीत नेमकं त्याउलट परिस्थिती घडताना दिसत आहेत. सोशल मीडिया देखील मोदी सरकारच्या विरोधात असल्याचं स्पष्ट दिसतंय. सध्या मोदी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय दृष्ट्या अडचणीत असल्याने त्यांचे भाजपाअंतर्गत विरोधक देखील संधीच्या शोधात आहेत असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

परिणामी, भाजपमधील गुजरात लॉबी भाजपमधील मोठ्या नेत्यांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात पत्ता कट करण्याच्या विचारात असल्याचं देखील म्हटलं जातंय. त्यात नितीन गडकरी यांचं नाव आघाडीवर असून तेच मोदींना पक्षांतर्गत पर्याय असल्याचं म्हटलं जातंय. त्यासाठीच CAG रिपोर्टमध्ये नितीन गडकरी यांच्या खात्याला भ्रष्टाचाराच्या बातम्यांमध्ये गोवण्यातही भाजप मधील गुजरात लॉबीचा हात असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे नितीन गडकरी सुद्धा नाराज असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, 16 ऑगस्ट रोजी भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी पार पडली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्मरण करून श्रद्धांजली वाहिली होती.

या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व उपस्थितांना समोर जाऊन नमस्कार करत असतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की…

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी चालत अनेक वरिष्ठ उपस्थितांना नमस्कार करत असताना समोरील सर्वजण त्यांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. मात्र त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर जेव्हा नरेंद्र मोदी नमस्कार करतात तेव्हा गडकरी त्यांना नमस्कार करणं तर दूरच राहिलं, ते मोदींकडे ढुंकून बघतही नाहीत… इतकंच नव्हे तर मोदी त्यांना समोरून हात जोडून नमस्कार करत असताना नितीन गडकरी यांनी स्वतःचे दोन्ही हात मागच्या बाजूला केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. एकूण नितीन गडकरी यांनी ठरवून मोदींचा अपमान केल्याचं नेटिझन्स समाज माध्यमांवर कमेंटमध्ये बोलत आहेत. त्यामुळे सध्या भाजपमध्ये सर्वकाही ठीक ‘नाही’ असंच म्हणावं लागेल.

News Title : Viral Video of Nitin Gadkari ignoring PM Modi trending on social media 23 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video Nitin Gadkari (1)(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x