Facebook Couple Challenge | घरातील महिलांचे फोटो शेअर करणं टाळा | ठरू शकतं धोक्याचं
मुंबई, २५ सप्टेंबर : सध्या सोशल मीडियावर हौशी लोकांनी बेस्ट फ्रेंड, बेस्ट साडी पिक्स चॅलेंज, बेस्ट कपल फोटो चॅलेंज अशा विविध टॅगलाइनखाली फोटो शेअर करून व्हॉट्सॲप, फेसबुकवर लाइक, कमेंटचा धुमाकूळ घातला आहे. लॉकडाउनमध्ये करायचं काय, हा प्रश्न अनेकींना सतावत असल्याने अनेक महिलांनी अतिउत्साहाने सोशल मीडियावर फोटो अपलोड केले आहेत. मात्र, विविध लूकमधील हे फोटोच मॉर्फिंगसाठी (संगणकावर बदल) टार्गेट होत असल्याने सायबर चोरट्यांना संधी चालून आली आहे.
फेसबुक या समाजमाध्यमाने सध्या जोडप्यांना वेड लावले. अगदी सत्तर वर्षांच्या जोडप्यांपासून ते नवदाम्पत्यांनी फेसबुकवरील ‘कपल चॅलेन्ज’ स्वीकारले आहे. फेसबुकवरील ‘कपल चॅलेन्ज’ या ‘हॅश टॅग’खाली दाम्पत्य धडाधड छायाचित्र अपलोड करीत आहेत. छायाचित्र अपलोड करण्यापूर्वी थांबा, साधव रहा. तुमच्या प्रोफाइलवर सायबर गुन्हेगारांची पाळत आहे. तुम्ही अपलोड केलेले छायाचित्र धोकादायक व मानहानीकारक ठरू शकते. आर्थिक फटकाही तुम्हाला बसण्याची शक्यता अधिक आहे. फेसबुकवर छायाचित्र अपलोड करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे.
मागील ३ दिवसांपासून फेसबुकवर कपल चॅलेन्ज, फॅमिल चॅलेन्ज, सिंगल चॅलेन्ज, खाकी चॅलेन्ज, डॉटर चॅलेज आदी ‘हॅशटॅग’ वापरून छायाचित्र अपलोड करण्याची स्पर्धाच लागली आहे. अनेक जण पत्नीसोबतचे विविध ठिकाणी काढलेले छायाचित्र कपल चॅलेन्ज , फॅमिली चॅलेन्ज या हॅशटॅग खाली फेसबुकवर अपलोड करीत आहेत. मात्र वेळीच सावध न झाल्यास सायबर गुन्हेगार या छायाचित्रांना मॉर्फ करुन आपली बनावट प्रोफाइल तयार करुन त्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीचे अश्लील छायाचित्र अपलोड करु शकतात. त्याद्वारे आपल्याला ब्लॅकमेलही करु शकतात. वेळीच सवाध न झाल्यास आपल्याला हातात पश्चातापाशिवाय काहीच राहणार नाही.
फेसबुक या समाजमाध्यमावर कपल चॅलेन्ज नावाने सर्च केल्यास एकाच वेळी लाखो दाम्पत्याचे छायाचित्र दिसून येतात. अगदी सहज उपलब्ध होत असलेल्या या छायाचित्रांचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. छायाचित्र मॉर्फ एडिट करुन गुन्हेगार आवडत्या व्यक्तीचे अश्लील छायाचित्र तयार करतात त्याद्वारे ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडण्याची शक्यता आहे. नागपुरात समाजमाध्यमांवरील छायाचित्रांचा वाप करुन ब्लॅकमेल करण्याच्या सुमारे साडेतीनशे तक्रारी आल्या असून एकूण सायबर गुन्ह्यांची संख्या साडेतीन हजारांपेक्षा अधिक आहे.
समाजमाध्यमांवर छायाचित्र अपलोड करताना युझर्सने सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. समाजमाध्यम हे टाइमपासचे साधन आहे. विविध ठिकाणचे छायाचित्र अपलोड करुन आपण सायबर गुन्हेगारांना नकळत आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती करुन देतो. छायाचित्राद्वारे गुन्हेगार आपली परिस्थिती ओळखून आपल्याला ब्लॅकमेल करु शकतो. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात येत आहे. समाजमाध्यमांवर छायाचित्र अपलोड करताना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक बागुल यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिस खात्यातील सुरक्षा तज्ज्ञांनी देखील याबाबत नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर न करण्याचे आवाहन केले होते. त्यामध्ये असे नमूद केले होते की, ‘महिलांच्या फोटोंचे सायबर चोरटे गैरवापर करून मॉर्फिंग करीत आहेत. सर्व महिला व पुरुष घरात रिकामा वेळ असल्याने लॉकडाउन कालावधीत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. नेमका याचाच गैरफायदा सायबर हॅकर्सनी घेतला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे टास्क तयार करून युजर्सला आकर्षित केले जात आहे. त्यापासून सावध राहा.’
‘‘प्रत्येकाने एकमेंकाना फोटो शेअर करायचे व ते व्हॉट्सॲप व फेसबुक स्टेटसला टाकायचे. ही फॅशन झाली आहे. त्यातून महिलांचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो शेअर केले जाऊ शकतात. त्यांची बदनामी करून ब्लॅकमेलिंग होऊ शकते. यासाठी वैयक्तिक अथवा कौटुंबिक कोणतेही फोटो शेअर करताना काळजी घ्या. प्रायव्हसी सेटिंग स्ट्रॉंग करा. गरज असेल तरच शेअर करते. लाइक व कमेंटला बळी पडू नका. त्यापेक्षा वैचारिक लिखाण करण्याचा प्रयत्न करा.’
News English Summary: The internet is always buzzing with activity each day. Each day, a new trend or challenge becomes popular on the internet. A new challenge has gone viral on the internet called ‘couple challenge’ where people who are dating post pictures of their partners together. From romantic poses or having a little bit of fun, pictures have been going viral on social media. Indeed, love makes the world go around. This challenge is a nice way to commemorate that love.
News English Title: Facebook couple challenge cyber cell alert Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो