Facebook India | पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख अंखी दास यांचा राजीनामा
नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. अंखी दास या ऑक्टोबर २०११ पासून फेसबुक इंडियासाठी काम करत होत्या. फेसबुकच्या आधी त्या भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिक पॉलिसी हेड होत्या. जानेवारी २००४ मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या होत्या.
Facebook’s India head of public policy Ankhi Das quits, says company
— Press Trust of India (@PTI_News) October 27, 2020
मुंबईवरच्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा अंखी दास यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता ज्याचं नाव होतं No Platform For Violence. हा लेख इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाला होता. कट्टरतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या १ लाख ४० हजार पोस्ट आम्ही फेसबुकवरुन हटवल्याचं त्यांनी या लेखात म्हटलं होतं. त्यांच्या या लेखामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.
अंखी आता चर्चेत का?
हे जाणून घेण्यासाठी आधी अंखी दास यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये छापलेल्या एका लेखाची चर्चा करायला हवी.
मुंबईवरील हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजेच 24 नोव्हेंबर 2018 ला अंखी दास यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचं शीर्षक होतं- No Platform For Violence. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, “कट्टरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांना आपला वापर करू न देण्याबद्दल फेसबुक कटिबद्ध आहे.” या वर्षभरात आम्ही 1 लाख 40 हजार गोष्टी हटवल्या आहेत, ज्यामध्ये कट्टरतावादाशी संबंधित गोष्टी होत्या.
या लेखात त्यांनी म्हटलं होतं की, फेसबुककडे तज्ज्ञांची एक टीम आहे. यामध्ये माजी सरकारी वकील, कायदेतज्ज्ञ, कट्टरतावाद विरोधी संशोधक, बुद्धिजीवी सहभागी आहेत. त्याचबरोबर जिथे कट्टरतावादी कारवाया चालतात अशा केंद्रातील भाषा समजणारे लोकही आहेत.
एकूणच त्यांच्या लेखाचा सूर असा होता, की फेसबुक कट्टरतावादाशी संबंधित गोष्टींचा प्रचार-प्रसार करणाऱ्या गोष्टी पकडण्याबद्दल अतिशय सजग आहे आणि त्यावर त्यांचं प्रभावी नियंत्रणही आहे. सध्या जो वाद सुरू आहे त्याच्या केंद्रस्थानी हाच मुद्दा आहे- भारतात फेसबुकवर काही द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी प्रसिद्ध झाल्या, मात्र अंखी दास यांनी त्या हटवण्यास विरोध केल्याची चर्चा आहे.
News English Summary: Facebook executive Ankhi Das, whose name came up in a recent controversy over alleged bias by the social networking giant in dealing with hate speeches, has resigned from the company. A statement by Ajit Mohan, Facebook India’s Managing Director, said: “Ankhi has decided to step down from her role in Facebook to pursue her interest in public service. Ankhi was one of our earliest employees in India and played an instrumental role in the growth of the company and its services over the last nine years.
News English Title: Facebook India head of public policy Ankhi Das quits says company News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS