द्वेषयुक्त भाषण | भाजपा आमदाराच्या फेसबुक इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी

अमरावती, ३ सप्टेंबर : देशात विरोधी पक्षाकडून फेसबुकवर प्रक्षोभक भाषणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात होता. या दरम्यान फेसबुकने भाजप नेते टी राजा सिंह यांच्यावर हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. फेसबुकने टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम या अकाऊंटवर बंदी आणली आहे.
भाजपा नेत्याच्या द्वेषयुक्त भाषणावरून ‘फेसबुक’ने हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचं ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशात राजकीय वादंग निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर फेसबुकने ज्या भाजपा आमदाराच्या पोस्टवरून वादाला तोंड फुटलं, त्यांच्यावर कारवाई केली आहे. तेलंगणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर फेसबुककडून कारवाई करण्यात आली आहे. राजा सिंह यांच फेसबुक अकाउंटही बंद करण्यात आलं आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्ट आल्यानंतर बुधवारी संसदीय समितीने फेसबुक प्रतिनिधींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याचा आरोप करत आपली बाजू मांडण्यास सांगितले. त्याचबरोबर मंगळवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कर्मचार्यांवर निवडणुकीत लोकांना मदत केल्याचा आरोप केला आहे.
News English Summary: Facebook, under pressure for weeks over its handling of hate speech, on Thursday banned BJP MLA T Raja Singh from its platform and Instagram for violating its policy around content promoting violence and hate.
News English Title: Social Media site Bans BJP MLA T Raja Singh In Report That Sparked Hate Speech Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB