5 November 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

अमेरिकेत निवडणुकीच्या निकालांना उशीर झाल्यास नागरी असंतोष उसळेल - मार्क झुकेरबर्ग

US Election 2020, Risk of civil unrest, Warns Mark Zuckerberg

वॉशिंग्टन, ३० ऑक्टोबर: अमेरिकेत या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक (U S presidential election) इतिसाहासातील सर्वात महागडी निवडणूक असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीत गेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या तुलतेन दुप्पट पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. यंदा तब्बल 14 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शोध समूह ‘द सेंटर फॉर रेस्पॉनसिव पॉलिटिक्स’ नी सांगितलं की मतदानापूर्वीच्या महिन्यात राजकीय निधीमध्ये मोठी वाढ झाली आहे. याकारणामुळे या निवडणुकीत जी 11 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ती मागे पडली आहे.

शोध समूहाने सांगितलं की, 2020 च्या निवडणुकीत 14 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या निवडणुकीत खर्च केलेले सर्व रेकॉर्ड मागे पडले आहे. समुहानुसार डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले उमेदवार आहेत ज्यांना दान देणाऱ्यांनी 1 अरब डॉलर इतका निधी दिला. ट्रम्प यांना 59.6 कोटी डॉलर मिळाले आहेत.

दरम्यान, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र निकालांना उशीर होण्याच्या याच शक्यतेबद्दल फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक असणाऱ्या मार्क झुकेरबर्गने अमेरिकेमध्ये नागरी असंतोष उसळण्याची भीती व्यक्त केली आहे. अमेरिकन निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उशीर झाला किंवा काही गोंधळ झाल्यास देशामध्ये अशांतता पसरेल असं मार्क म्हणाला आहे. मार्क कॅपिटोल हिल येथील एका कार्यक्रमामध्ये बोलत होता.

याच भीतीमुळे मार्कने अन्य सोशल नेटवर्किंग साईट्स आणि खास करुन फेसबुकच्या आपल्या टीमला सतर्क केलं आहे. हा काळ सोशल मीडियासाठी अग्नी परीक्षेसारखा आहे. फेसबुकसाठीही हा परीक्षेचा काळ आहे, असं मार्क म्हणाला आहे. फेसबुकच्या माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार होणार नाही यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची आणि उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही मार्कने म्हटलं आहे. मतदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव येणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेणे ही सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी असल्याचे मत मार्कने मांडल्याचे एएफपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर फेसबुकने मतदारांची फसवणूक केल्याचे आरोप झाले होते.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या आधी पैसे देऊन फेसबुकच्या माध्यमातून केलेली एक राजकीय जाहिरात फेसबुकने हटवल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला. विरोधी पक्षांनी फेसबुकने आमच्या निवडणूक प्रचारामध्ये अडथळा आणून त्याचा प्रभाव कमी केल्याचा आरोप केला आहे. फेसबुकने एका जाहिरातील नकार दिल्यानंतर डेमोक्रॅटिक पार्टीने फेसबुकवर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. फेसबुकचे प्रोडक्ट मॅनेजर असणाऱ्या रॉब लिदर्न यांनी आम्ही या प्रकरणाची चौकशी कर असून काही जाहिरातींना चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आले नाही ना यासंदर्भात तसाप सुरु असल्याची माहिती दिली.

फेसबुकवरील ज्या जाहिरातीमुळे वाद झाला त्यामध्ये ट्रम्प यांच्या विजयाचा दावा करण्यात आला होता. यावर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या प्रसारमाध्यम सल्लागार अशणाऱ्या मेगन क्लासेनने फेसबुकवर आरोप करत फेसबुकने आमची जाहिरात स्वीकारण्यास नकार दिल्याचे म्हटलं होतं. या जाहिरातीमध्ये मतदानाच्या दिवसाचा उल्लेख असल्याने आम्हाला नकार देण्यात आला मात्र दुसरीकडे ट्रम्प यांची जाहिरात अजूनही दाखवली जात आहे, असं क्लासेन म्हणाले. क्लासेन यांनी ट्रम्प यांच्या जाहिरातीला स्क्रीनशॉर्ट ट्विट करत फेसबुकवर भेदभाव केल्याचा आरोप केला होता.

 

News English Summary: Facebook chief Mark Zuckerberg on Thursday warned of the potential for civil unrest as votes are tallied in a US election that will be “a test” for the social network. Zuckerberg expressed his concern while describing safeguards against misinformation and voter suppression at the leading social network that are intended to avoid the kinds of deception and abuse that played out four years ago. “I’m worried that with our nation so divided and election results potentially taking days or weeks to be finalized there is a risk of civil unrest,” said Zuckerberg, who had also been grilled during a session on Capitol Hill earlier this week.

News English Title: US Election 2020 risk of civil unrest around American election warns Mark Zuckerberg News updates.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x