उद्धव ठाकरेंसाठी सावधानतेचा इशारा | हिंदू शब्दा आडून मोठं अभियान | Fact Check Alert
मुंबई, ७ डिसेंबर: दहावी आणि बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये हिंदू शब्द वगळल्याने भाजप नेते आक्रमक झाले होते. “ठाकरे सरकारने हिंदू शब्दावरच फुली मारली आहे. सरकारला हिंदू शब्दाचे वावडे आहे,” असा आरोप मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केला होता आणि त्याला मराठीसहित हिंदी प्रसार माध्यमांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षा फॉर्मममध्ये धर्माच्या रकाण्यात हिंदू शब्द वगळण्यात आला आहे. त्याऐवजी अल्पसंख्याकेतर (नॉन-मायनॉरिटी) असा उल्लेख केल्याचा आरोप अतूल भातखळकर यांनी केला होता. याच मुद्द्याला घेऊन देशातील मोठ्या वृत्त वाहिन्यांवर भारतीय जनता पक्षाने ठाकरे सरकारला घेतल्याचे पाहिले. दहावी तसेच बारावीचे परीक्षा फॉर्म मागे घ्यावेत. तसेच सरकारने या फॉर्ममध्ये हिंदू धर्माचा उल्लेख करावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. तसेच, ठाकरे सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर भाजप याविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देखील भाजपने ठाकरे सरकारला दिला आहे. मात्र आता शिवसेनेने सावध राहण्याची वेळ आली आहे. कारण भाजप स्वतःच्या चुका उद्धव ठाकरेंच्या माथी मारून ‘हिंदू विरोधी शिवसेना’ अभियान राबवत असावं असं फॅक्टचेक मध्ये समोर आलं आहे.
बाटग्यांची बांग…
ठाकरे सरकारने हिंदुत्व सोडले, आता हिंदू शब्दावरही चौकट मारली. यांचा निलाजरे पणा पाहा 10 वी, 12 वी परीक्षेच्या फॉर्मवर हिंदू शब्द न वापरता नॉन मायनोरिटी हा शब्द वापरला आहे.याद राखा, फॉर्मवर येत्या 24 तासात हिंदू शब्द दिसला नाही तर, ठीक ठिकाणी फॉर्मची होळी करू. pic.twitter.com/KRZDRDrnjm
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 2, 2020
अतुल भातखळकरांच्या त्या आरोपावर टाईम्स नाऊने एक न्यूज रिपोर्ट दिला होता. “महाराष्ट्र शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षा फॉर्ममधून‘ हिंदू ’पर्याय काढून टाकला आहे. “राज्य सरकारने पुढील मंडळाच्या परीक्षांसाठी नव्याने जाहीर केलेल्या परीक्षा फॉर्ममध्ये हिंदू पर्यायाऐवजी‘ अल्पसंख्याक ’हा शब्द वापरला आहे,” असा दावा चॅनलने केल्याचं पाहायला मिळतं आहे.
भाजपने सोशल मीडियावर देखील या वृत्ताला भरपूर प्रसिद्धी दिली आणि त्यावर नेटिझन्स मंडळी देखील मागचा पुढचा विचार न करता व्यक्त झाली. हिंदू धर्माचा संबंध आल्याने भाजपने याची व्याप्ती वाढवली आणि त्यात थेट आरएसएस समर्थक देखील समाज माध्यमांवर सामील झाले. आकाश आरएसएस नावाचा प्रोफाइल समाज ट्विटरवर फेक कन्टेन्ट शेअर करताना अनेकदा पाहिला जातो, किंबहुना तेच अशा लोकांचं काम असावं.
महाराष्ट्र स्टेट एजुकेशन बोर्ड ने अब अपने फॉर्म में से हिंदू धर्म को ही हटा दिया है?
बच्चों से पूछा गया है कि आपका धर्म क्या है सारे धर्मों के नाम लिखे हैं हिंदू नहीं लिखा है
हिंदू की जगह नॉन माइनॉरिटी लिखा है pic.twitter.com/WAO6eAfkx3
— Akash RSS (@Satynistha) December 5, 2020
महाराष्ट्र स्टेट एजुकेशन बोर्ड ने अब अपने फॉर्म में से हिंदू धर्म को ही हटा दिया है
बच्चों से पूछा गया है कि आपका धर्म क्या है सारे धर्मों के नाम लिखे हैं हिंदू नहीं लिखा है
हिंदू की जगह नॉन माइनॉरिटी लिखा है pic.twitter.com/GvStXNOfle
— Ocean Jain (@Ocjain3) December 3, 2020
अगदी महाराष्ट्र शासनाने एसएससी व बारावीच्या परीक्षा फॉर्ममधून ‘हिंदू’ या उपवर्गातून काढले आहे, असं म्हटलं गेलं ते फेसबुकवरही प्रसिद्ध झाले आहेत.
आता भाजपाच्या आरोपात तथ्य-तपासणी (फॅक्टचेक)
सदर फॅक्टचेकमध्ये खालील दाव्यांची तपासणी करण्यात आली आहे.
१. पुढील बोर्ड परीक्षेसाठी हा नवीन फॉर्म जाहीर केला आहे का?
२. ‘हिंदू’ हा धर्म एक म्हणून निवडण्याचा पर्याय काढून टाकला गेला आहे का?
समोर आलेलं सत्य: वास्तविक सदर फॉर्म 2014 पासून वापरात आहे.
२०१४ ते २०१९ या काळात शिवसेनेशी युती करून महाराष्ट्रात भाजपाची सत्ता होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. तसेच शिक्षण मंत्रालयाचा कारभार देखील भारतीय जनता पक्षाकडे होता आणि शिक्षण मंत्री होते विनोद तावडे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, “सदर फॉर्मचा २०१३ मध्ये तयार करण्यात आला आणि तो २०१४ पासून वापरला जात आहे.”
वास्तविक प्रकरण भाजपचे मुख्यमंत्री असतानाचं आणि मात्र पत्रकारांशी संवाद साधताना भातखळकर म्हणाले की, ‘हिंदू’ शब्दाऐवजी ‘अल्पसंख्यक’ हा शब्द “काहींना” सुखी करण्यासाठी आणि “एखाद्याचे रक्षण करण्यासाठी” अलिकडील बदल आहे. व्होट बँक, हिंदुविरोधी निर्णय सातत्याने घेतले जात आहेत, असं सांगत एकप्रकारे शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने हिंदू विरोधी झाली आहे असा चुकीचा प्रचार सुरु केला आहे आणि त्यात केंद्रस्थानी आहेत थेट उद्धव ठाकरे. पण सदर विषय हिंदू विरोधी आहे असं भाजपाला ठासून सांगायचं असेल तर हा फॉर्म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या काळातील आहे जे भाजपचे नेते आहेत.
वास्तविक आमच्या फॅक्टचेकमध्ये भाजपचे आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे आढळले आहे.
या फॉर्मची प्रत महाराष्ट्र बोर्ड, पुणेच्या संकेतस्थळावर २०१७ मध्ये अपलोड (Click Here to confirm) करण्यात आली आहे (एसएससी फॉर्मची) त्यात ‘अल्पसंख्यक’ हा पर्याय आहे. त्यात एक परिपत्रक आहे ज्यामध्ये मराठीत 9/9/2017 तारखेचा स्पष्ट उल्लेख आहे.
तशाच प्रकारचा 2017 मध्ये अपलोड केलेला एचएससी परीक्षा फॉर्म (HSC Form) येथे पाहू शकता. त्यासाठी आम्ही एसएससी व बारावीच्या परीक्षांचे नमुने असणारी महाराष्ट्र राज्य बोर्डाची वेबसाइट देखील तपासली. त्यावर कम्प्युटर जनरेटेड (मानवी नाही) फॉर्मची निर्मिती तारीख 2017 आहे असं स्पष्ट दिसतं आहे.
जुना पुरावा म्हणून आम्ही ३ सप्टेंबर २०१३ रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त देत आहोत (Click Here to confirm) ज्यामध्ये हे स्पष्ट होतंय की सदर फॉर्म 2014 पासून राज्य सरकारचं शिक्षण मंत्रालय किंवा शिक्षण मंडळ वापरतं. “पुढील शैक्षणिक वर्षापासून एसएससी आणि बारावीच्या परीक्षेच्या अर्जांसाठी स्वतंत्र कॉलम आहे जिथे उमेदवार अल्पसंख्याक समुदायाचे असतील तर ते तसा उल्लेख करू शकतात, ”असं तत्कालीन वृतांत देखील म्हटले आहे.
त्यामुळे भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदू धर्माच्या आडून लक्ष करण्याचं सुरु अभियान अत्यंत घातक असून त्याचे दूरगामी परिणाम शिवसेनेला भोगावे लागतील जात त्यांनी वेळीच सावध होईन भाजपचं अभियान भाजपवरच पलटवलं नाही तर. सदर विषयात सर्व पुराव्यानिशी आम्ही हा फॅक्टचेक केला असून त्यात भाजप चुकीचे दावे करून मोठ्या प्रमाणात देशभर संभ्रम निर्माण करत आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे भाजपाला याच विषयावरून थेट विधानसभेत तोंडघशी पाडणं गरजेचं आहे.
IMP: ‘Hindu’ is not one of the options because it isn’t a minority religion.
News English Summary: The BJP leader was aggressive in omitting the word Hindu in the 10th and 12th examination forms. “The Thackeray government has flourished on the word Hindu. The government is fond of the word ‘Hindu’, “said Atul Bhatkhalkar, MLA in charge of Mumbai BJP.
News English Title: Hindu Politics against CM Uddhav Thackeray and Shivsena news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल