22 January 2025 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

गुजरात दौरा | शेतकरी बैठकीत भाजप कार्यकर्ते | गुजरात CMO'कडून माध्यमांना चुकीची माहिती

Prime Minister Narendra Modi, Farmers Protest, Gujarat Katch tour

कच्छ, २० डिसेंबर: विरोधकांच्या विरोधानंतरही संसदेत केंद्राकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या कृषी विधेयकातील तरतुदींविरोधात शेतकरी आंदोलनाला तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कडाकाच्या थंडीत कुडकुडत्या स्थितीत शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसलाय. मोदी सरकारमधील मंत्री आणि शेतकऱ्यांच्या अनेकदा चर्चा होऊनही त्यातून काहीही मार्ग निघू शकलेला नाही. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरही आंदोलकांचं समाधान झालेलं नाही.

याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 डिसेंबरला एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर होते. त्यावेळी कच्छमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला असं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्याची छायाचित्रं देखील प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आली होती. मात्र भेटीमागील मार्केटिंग सत्य बाहेर आलं आहे. कदाचित त्यासाठीच आंदोलन दिल्लीत सुरु असताना मोदींनी गुजरातमध्ये शेतकऱ्यांना भेटण्याचा घाट घातला आणि त्यासाठी निवड केली गुजरातमधील शीख शेतकऱ्यांचीच. मात्र चर्चेस्थानी माध्यमांना दूर ठेवून चुकीची वृत्त प्रसिद्ध करून देशभर वातावरण निर्मिती करण्यात आली. प्रसार माध्यमांपर्यंत चुकीची माहिती देत होतं गुजरात मुख्यमंत्री कार्यालय असं फॅक्टचेक मध्ये समोर आलं आहे.

पंतप्रधानांच्या कच्छ भेटीदरम्यान भेट घेणारे शीख शेतकरी नव्हे तर शीख समाजातील भाजपाचे कार्यकर्ते असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे गुजरात सरकारने सदर चर्चा कृषी कायद्यांवर असल्याची वृत्त पेरणी केली होती तरी संबंधित शीख समुदायाचा चर्चेचा विषय हा कच्छ भागातील लखपत तालुक्यात गुरुद्वाराच्या बांधकामाशी संबंधित होता. मोदींनी सदर चर्चेत कुठेही कृषी कायद्याचा विषय काढला नव्हता समोर आलं आहे. याबाबत ट्विट करताना गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाने चुकीची माहिती दिली आणि त्यात शीख शेतकरी भेट जाणीवपूर्वक सांगितलं.

मात्र या बैठकीतील एक कार्यकर्ता माध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपला गेला आणि त्याला या संबंधित प्रश्न केला असता त्याने सदर बैठकीत कृषी कायद्यावर चर्चा झाली नाही आणि या बैठकीचा शेतकऱ्यांशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं. त्यामुळे गुजरात सरकार कसं चुकीची माहिती प्रसिद्ध करत होतं याचा प्रत्यय आला. तसेच हा खटाटोप करण्यासाठी मोदींनी स्वतःसाठी सुरक्षित गुजरातच का निवडलं याच देखील अंदाज येऊ शकतो.

ज्यांना कच्छच्या स्थानिक राजकारणाविषयी माहिती आहे त्यांनी सांगितलं की राजू भाई सरदार यांचे खरे नाव जुगराज सिंह असून ते नारा गावचे आहेत आणि सक्रिय भाजप पदाधिकारी आहेत. २०१३ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना शीखांच्या एका शिष्टमंडळाचे एका जमिनीच्या संदर्भात मोदींची भेट घेतली होती आणि त्याच नैतृत्व जुगराज सिंह यांनी केलं होतं. भाजपचे झोनल सेक्रेटरी बनण्यापूर्वी ते नारा गावचे सरपंच होते ज्यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. कच्छ मधील नारा गावात मोठ्या संख्येने शीख मतदार असल्याने जुगराज सिंह यांना पद देऊन भाजपने येथे स्वतःचा जम बसवला आहे. त्यामुळेच मोदींच्या दौऱ्यात आणि शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने हेच गाव निवडण्यात आलं ज्याचं नैतृत्व पुन्हा जुगराज सिंह यांनीच केलं आहे. त्यांची पोलखोल होताच जुगराज सिंह यांचं ट्विटर अकाउंट @jugrajSingh_bjp सस्पेंड झाल्याचं दिसतं. मात्र त्यांच्या वेबसाइटवरून (येथे पाहू शकता) संपूर्ण पोलखोल झाली आहे. यावरून मोदींचा कच्छ दौरा नेमका कोणत्या हेतूने ते सत्य समोर आले आहे.

 

News English Summary: Those who know about the local politics of Kutch said that Raju Bhai Sardar’s real name is Jugraj Singh, he is from Nara village and is an active BJP office bearer. In 2013, when Modi was the Chief Minister of Gujarat, a delegation of Sikhs had met Modi regarding a piece of land and the same leadership was given by Jugraj Singh. Before becoming the BJP’s zonal secretary, he was the sarpanch of Nara village who was supported by local BJP office bearers. As there are a large number of Sikh voters in Nara village in Kutch, BJP has established itself here by giving post to Jugraj Singh. That is why this village was chosen during Modi’s visit and on the occasion of the farmers’ movement, which is again led by Jugraj Singh.

News English Title: Prime Minister Narendra Modi meet to farmers in Gujarat Katch tour news updates.

हॅशटॅग्स

#Fact Check(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x