Beauty Skin Care Tips | हेल्दी आणि सुंदर त्वचेचं हे आहे रहस्य, चाळिशीनंतर देखिल दिसाल तरूण

Beauty Skin Care Tips | जगभरातील अनेक स्त्रियांना असं वाटत असतं की, वय किती पण वाढलं तरी त्वचा मात्र सोळा-सतरा वर्षाच्या मुली सारखी दिसावी. परंतु जसजसं वय वाढत जातं तशीच त्वचा देखील बदलत जाते आणि निस्तेज बनू लागते. चाळीशी ओलांडल्यानंतर स्त्रियांच्या चेहऱ्यावरील तेज मंदावते. म्हणूनच आज आम्ही खास चाळीशीच्या महिलांसाठीच्या स्कीनकेअर रूटीन बद्दल सांगणार आहोत.
एकदा चाळीशी ओलांडल्यानंतर अनेक स्त्रियांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, काळे डाग, त्वचा कोरडी पडणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. काही महीला स्वतःचा आणि घराच्या कामांमध्ये एवढ्या व्यस्त असतात की त्यांना स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. परंतू आता काळजीचे काहीच कारण नाही. आम्ही सांगितलेल्या गोष्टी आणि टीप्स वापरुन तुम्ही तुमच्या निस्तेज त्वचेचा पुन्हा उजळवू शकता आणि पुन्हा तजेलदार बनवु शकता.
चाळीशीनंतर सुंदर दिसण्यासाठी हेल्दी आणि ग्लोविंग त्वचेचे रहस्य :
1. क्लिनिंग करणे
स्कीनकेअर रुटीनमधला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला भाग म्हणजे क्लिनिंग करणे. चेहरा क्लीनिंग करण्यासाठी तुम्ही चांगल्या ब्रँडचे क्लिंजर वापरू शकता. क्लिंजर विकत घेताना प्रॉडक्टमध्ये ग्लिसरीन आणि हायलूरोनिक ऍसिड आहे की नाही ते तपासून पाहायचे आहे. हायलूरोनीक ऍसिड आणि ग्लिसरीनमुळे तुमची त्वचा कायम मुलायम राहण्यास मदत होते.
2. सनस्क्रीनचा करा वापर
कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपली त्वचा जास्त प्रमाणात डल आणि काळपट पडते. त्वचा काळपट पडू नये म्हणून तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये सनस्क्रीनचा वापर करू शकता. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला उन्हापासून वाचवण्यासाठी मदत करते. तुम्हाला फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे, तुमच्या सनस्क्रीन प्रॉडक्टचे SPF 30 पेक्षा अधिक असावे. जर तुम्ही घरात असाल तर, 30 पेक्षा कमी SPF वाले सनस्क्रीन वापरले तरी चालेल.
3. अँटी एजिंग प्रॉडक्ट्सचा करावा वापर
स्त्रियांचं वय वाढल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, चेहरा कोमेजून जाणे, ओपन पॉर्स, त्वचा लुज होणे अशा समस्स्या दिसू लागतात. अशा वेळी स्त्रियांनी अँटी एजिंग मास्क, अँटी एजिंग फेसपॅक, क्रीमचा वापर करावा. या क्रीम्सचा वापर केल्याने तुमची त्वचा जास्त टवटवीत दिसेल.
4. पौष्टिक आहार घेणे आहे गरजेचे
त्वचेला आतून सुंदर आणि सतेज बनविण्यासाठी तुम्हाला पौष्टिक आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, अंडी, दही यांसारख्या पदार्थांचं सेवन करू शकता. अशातच तुम्हाला जंक फूडचे सेवन आणि पॅकबंद फूडचे सेवन करने टाळले पाहिजे.
5. त्वचेला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा
त्वचेला आतून आणि बाहेरून हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता असते. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही हायड्रा फेशियल तसेच, मॉइश्चरायझर, टोनर अशा प्रोडक्टचा वापर करू शकता. जास्त वय झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील दोष पटकन दिसून येतात. यासाठीच तुम्ही भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करून डीहायड्रेशनच्या समस्येवर मात केले पाहिजे.
6. योग्य प्रमाणात झोप घेणे आहे आवश्यक
अनहेल्दी त्वचेपासून वाचण्यासाठी तुम्हाला योग्य प्रमाणात झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला कमीत कमी सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेत नसाल तर, तुमचा चेहरा सुजणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे, फाईन लाईन्स क्रिएट होणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवू लागतील
7. डोळ्यांची काळजी घ्यायला विसरू नका
आपल्या शरीरामधील सर्वात नाजूक अवयव डोळा आहे. आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा सुद्धा अतिशय नाजूक असते. त्यामुळे डोळ्यांची खास काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशात आपले वाढते वय डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर पटकन दिसून येते. डोळ्यांच्या आसपासची त्वचा सुरकतू लागते. त्याचबरोबर फाईन लाईन्स आणि काळी वर्तुळे देखील दिसू लागतात. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही हायड्रेटिंग eye cream किंवा विटामिन ई कैप्सूल आणि एलोवेरा जेल लावू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Beauty Skin Care Tips for looking younger after 40 age check details on 13 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल