15 January 2025 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News

Highlights:

  • Face Pack
  • टोमॅटो आणि साखर
  • टोमॅटो आणि लिंबू
  • टोमॅटो आणि बेसन पीठ
Face Pack

Face Pack | टोमॅटो हा पदार्थ आपण प्रत्येक भाजीत, डाळीमध्ये अथवा भातामध्ये देखील वापरतो. टोमॅटोमुळे कोणत्याही पदार्थाची चव द्विगुणीत होते. अनेकजण सलाडमध्ये कच्चा टोमॅटो देखील खातात. टोमॅटोमुळे आपले शरीर हायड्रेट राहते. शरीराबरोबर त्वचा देखील हायड्रेट राहते. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात लाईकोपिन, अँटिऑक्सिडंट आणि विटामिन सी गुणधर्म आढळून येतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

टोमॅटोचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील केला जातो. आज आपण टोमॅटोपासून तयार होणारे 3 जबरदस्त फेस स्क्रब पाहणार आहोत. ज्यांच्या वापराने तुमचा चेहरा मुळापासून एक्सपोलिएट होऊन तजेलदार बनेल. चला तर पाहूया टोमॅटोचे फेसस्क्रब.

अशा पद्धतीने घरच्या घरी तयार करा टोमॅटो पासून बनलेले हे तीन फेस स्क्रब

1) टोमॅटो आणि साखर :
टोमॅटो आणि साखरेपासून बनलेलं फेस स्क्रब तुमच्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. चेहरा मुळापासून एक्सपोलिएट होऊन तजेलदार आणि सॉफ्ट देखील बनेल. यासाठी तुम्हाला एक शिजलेला टोमॅटो आणि एक चमचा साखर लागणार आहे. सर्वप्रथम एका वाटीमध्ये शिजलेला टोमॅटो घेऊन मॅश करा. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा साखर ऍड करून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर पसरवून स्क्रबप्रमाणे चेहरा घासा तुमचा चेहरा भरपूर ग्लोइंग बनेल.

2) टोमॅटो आणि लिंबू :
टोमॅटो आणि लिंबू या दोनही पदार्थांमध्ये विटामिन सी चे गुणधर्म असतात. त्यामुळे दोघांच्या वापराने तुमच्या चेहऱ्यावरील सर्व प्रकारचे काळे डाग मुळापासून निघून जाण्यास मदत होईल. त्याचबरोबर चेहरा उजळ देखील बनेल. यासाठी तुम्हाला एक शिजलेला टोमॅटो घेऊन त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे. त्यानंतर हे मिश्रण एकत्रित करून चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण पूर्णपणे सुकल्यानंतर पाण्याचा ओला हात घेऊन स्क्रबप्रमाणे चेहऱ्यावर फिरवायचं आहे.

3) टोमॅटो आणि बेसन पीठ :
बऱ्याच महिला चेहऱ्याच्या काळजीसाठी बेसन पिठाचा वापर करतात. बेसन पीठामुळे तुमचा चेहरा स्मूथ बनण्यास मदत होते. समजा तुमचा चेहरा प्रचंड प्रमाणात कोरडा असेल तर, टोमॅटो आणि बेसनपासून तयार केलेले स्क्रब वापरून तुमचा चेहरा प्रचंड प्रमाणात गुळगुळीत बनेल. त्यासाठी तुम्हाला कच्च्या टोमॅटोचा रस काढून घ्यायचा आहे. रस काढून घेण्यासाठी तुम्ही मिक्सरला टोमॅटो बारीक करून त्याचं पाणी गाळणीच्या साह्याने गाळून घेऊ शकता. आता या पाण्यामध्ये एक चमचा बेसन पीठ मिक्स करा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुलाब पाणी देखील घेऊ शकता. हे मिश्रण एकत्रित करून चेहऱ्यावर स्क्रबप्रमाणे फिरवून घ्या. लक्षात ठेवा आपण स्क्रब करत आहोत त्यामुळे थोडं जाड दळलेलं बेसन पीठ वापरा.

Latest Marathi News | Face Pack 03 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Face Pack(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x