16 April 2025 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Healthy Skin | हेल्दी आणि निरोगी त्वचेसाठी फॉलो करा 'या' टिप्स, तुमची त्वचा मुलायम आणि निरोगी होईल

Healthy Skin

Healthy Skin |  त्वचेची काळजी ही जेवढी बाहेरून घेतली जाते तेवढी आतुनही घ्यायला हवी. आपण जे काही आहार करतो तोच त्वचेवर दिसून येतो. तर आम्ही तुम्हाला अंतर्गत शरिराची कशी काळजी घ्यायची हे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि निरोगी होईल.

1. पालकाची भाजी, अर्थातच त्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी, ई, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, ओमेगा -3 फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. तसेच त्यामध्ये ल्युटीन असते ज्यामुळे आपले डोळे चमकदार होतात.

2. वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करण्यासाठी अँटिऑक्सिडंट्सच्या बाबतीत ब्लूबेरीला प्रथम क्रमांकाचे खाद्य मानले जाते.

3. दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते ज्यामुळे आपली त्वचा, दात आणि नखे निरोगी आणि चमकदार बनतात.

4. जंगली सॅल्मनमध्ये सेलेनियम असते, जे आपल्या त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करते. याशिवाय सॅल्मनमध्ये असलेले व्हिटॅमिन डी तुमची हाडे आणि दात मजबूत करते.

5. ऑयस्टरमध्ये असलेल्या झिंक मुळे आपल्या पेशींच्या निर्मिती आणि दुरुस्तीला गती मिळते आणि आपली नखे, केस, डोळे निरोगी राहतात.

6. आपल्या आहारात अक्रोडचा समावेश असणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. यामुळे त्वचा गुळगुळीत होते, तसेच चमकदार केस, चमकदार डोळे आणि निरोगी हाडे होतात.

7. किवी या फळामुळे आपल्या शरीरीला व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात मिळते. ज्यामुळे आपल्या शरीरावरील सुरकुत्या प्रतिबंधित होतात.

8. रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन असते, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते.

9. चॉकलेट तर सर्वांना आवडतेच मात्र आपण डार्क चॉकलेट खाने जास्त फायदेशीर आहे यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते आणि यामुळे आपल्या त्वचेचे उन्हापासून संरक्षण देखील होते.

10. तुमचे शरीर आतून जितके स्वच्छ असेल तितकेच ते बाहेरून स्वच्छ दिसेल.

11. यकृत, पोट आणि आतडे स्वच्छ ठेवण्यासाठी उच्च फायबरयुक्त अन्न आहारात घ्या.

12. सफरचंदामध्ये पेक्टिन असते, हे एक कार्बोहायड्रेट संयुग आहे जे पोटातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि आतडे देखील मजबूत करते.

13. गाजर आणि भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते आणि जे त्वचेला स्वच्छ लुक देते.

14. सकाळी उठल्यानंतर ताज्या लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्या यामुळे सिस्टम साफ राहते.

15. नट आणि ओट्स यांसारखे प्रथिनेयुक्त आहार घ्यावेत. ते ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि फायबरने देखील समृद्ध आहेत, जे त्वचेला सैल होण्यापासून वाचवतात.

16. मासे शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असतात. तुम्ही सॅल्मन फिश आहारात घ्या, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.

हे डायेट जर तुम्ही फॉले केले तर तुमची त्वचा आतुन आणि बाहेरून स्वच्छ आणि निरोगी राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Follow these tips for healthy and glowing skin Checks details 15 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Healthy Skin(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या