15 January 2025 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Korean Hair Care Tips | साऊथ कोरियाच्या मुलींसारखे सिल्की हेअर हवेत, मग ट्राय करा हा मॅजिकल शाम्पू - Marathi News

Highlights:

  • Korean Hair Care Tips
  • अशी आहे होम रिमेडी :
  • महत्त्वाचं :
Korean Hair Care Tips

Korean Hair Care Tips | प्रत्येक मुलीला साऊथ कोरियाच्या मुलींसारखे सुळसुळीत आणि सिल्की केस प्रचंड आवडतात. परंतु प्रदूषणामुळे केसांची पूर्णपणे वाट लागलेली असते. बऱ्याच महिलांना फ्रीझी हेअर आणि कोरड्या केसांसंबंधीच्या अनेक समस्या सहन कराव्या लागतात. कोरड्या केसांमुळे केसांमध्ये प्रचंड प्रमाणात गुंता देखील होतो आणि हा गुंता सोडवताना हेअर फॉल देखील प्रचंड प्रमाणात होतो. आज आम्ही तुम्हाला एक कोरियन टिप देणार आहोत. यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. घरातील साखरेपासून आणि तांदुळापासून तुम्ही तुमचे केस सिल्की बनवू शकता.

अशी आहे होम रिमेडी :
ही होम रिमेडी तयार करण्यासाठी तुम्हाला एक दिवस वाट पहावी लागेल. कारण की ही होम रिमेडी तयार होण्यासाठी संपूर्ण एका रात्रीचा कालावधी लागतो. तुम्हाला ऐकून नक्कीच आश्चर्य वाटत असेल की, रात्रभर होम रिमेडी बनवत बसायची का तर, तसं अजिबात नाही. अशा पद्धतीने तयार करा होम रिमेडी.

1) सर्वप्रथम तुम्हाला एका वाटीमध्ये अर्धा ग्लास पाणी, एक चमचा साखर आणि एक चमचा तांदूळ ऍड करायचे आहेत.

2) तुम्हाला हे पाणी रात्रभर तसंच भिजत ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर साखर पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलेली असेल.

3) साखरेच्या या पाण्यामध्ये आणि तांदुळाच्या अर्काच्या पाण्यामध्ये तुमच्या रोजच्या वापरात असणारा शाम्पू तुम्हाला ऍड करायचा आहे.

4) मिश्रण बोटाच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे. हे पाणी तुम्हाला केस धुताना वापरायचं आहे. केसांना डायरेक्ट शाम्पू लावणे ऐवजी तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता. साखर आणि तांदुळामुळे तुमचे केस प्रचंड प्रमाणात सिल्की होतील.

5) तुमचे केस शायनी आणि सिल्कीच नाही तर घनदाट देखील होतील. तुमच्या केसांची वाढ आपोआप होऊ लागेल. या रेमेडीचा वापर तुम्ही सातत्याने करत राहिला तर, काही महिन्यातच तुमचे केस गुडघ्या एवढे लांब होतील.

महत्त्वाचं :
बऱ्याच व्यक्तींची त्वचा प्रचंड प्रमाणात सेन्सिटिव्ह असते. तुमची त्वचा सुद्धा सेन्सिटिव्ह असेल तर, तुम्ही साखर आणि तांदुळाचं कॉम्बिनेशन तुम्हाला सूट होतंय की नाही हे पाहण्यासाठी पॅच टेस्ट करा. पॅच टेस्ट करून तुम्हाला या होम रिमेडीचा नियमितपणे वापर करावा की नाही हे समजून येईल. कारण की प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगवेगळा असतो.

Latest Marathi News | Korean Hair Care Tips 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Korean Hair Care Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x