18 April 2025 8:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Monsoon Makeup Tips | पावसाळ्यात मेकअप बनवा लाँग लास्टिंग, महिलांनी फॉलो कराव्या अशा 10 मेकअप टिप्स

Monsoon Makeup Tips

Monsoon Makeup Tips | सर्वच महिलांना मेकअप करायला आवडते. पण पावसाळ्यात मेकअप जास्त वेळ टिकत नाही. आज आम्ही तुम्हाला मेकअप जास्त वेळ कसा टिकवता येईल याच्या खास टिप्स सांगणार आहोत.

मेकअप टिप्स :
१) पावसाळ्यात मेकअप करण्यापूर्वी 5-10 मिनिटे चेहऱ्यावर बर्फाने हलक्या हाताने मसाज करावी. असे केल्याने चेहऱ्यावरील मेकअप जास्त वेळ राहतो.
२) पावसाळ्यात हलका वॉटरप्रूफ मेकअप करणे अधिक चांगले असते.
३) पावसाळ्यात मॉयश्चरायझिंग क्रीम्स, आॅयली फाउंडेशन आणि क्रीम बेस्ड कलर मेकअप करू नका.
४) मेकअप बेससाठी मॅट कॉम्पॅक्ट किंवा कॅलामाइन लोशन वापरावे पावसाळ्यात योग्य ठरेल.
५) पावसाळ्यात फाउंडेशन न लावता फेस पावडरचा वापर करावा.
६) वॉटरप्रूफ मस्करा आणि आयलायनर लावल्याने पावसाळ्यात मेकअप चांगला राहतो.
७) पावसाळ्यात क्रीम ऐवजी पावडर आयशॅडो वापरावे.
८) पावसाळ्यात आयब्रो पेन्सिल वापर करणे टाळावा. त्याऐवजी ब्रो ब्रशवर थोडेसे हेअर जेल लावावे.
९) पावसाळ्यात लाइट ब्लशचा वापर करावा. क्रीम ब्लशर वापर केल्याने पावसाळ्यात मेकअप चांगला राहतो.
१०) पावसाळ्यात लॉंग लास्टिंग पावडर मॅट टोन किंवा क्रीम मॅट लिप कलर्स वापरणे सर्वोत्तम असते.

यंग लुकसाठी असा करा मेकअप :
* जास्त गडद लिपस्टिक लावल्याने तुम्हाला क्लासी लुक मिळेल. पिंक टोन किंवा लिपग्लॉस लावल्यास तुम्ही यंग दिसू शकता.
* अनेक महिला त्यांच्या त्वचेच्या टोनपेक्षा लाइट फाउंडेशन शेडचा वापर करतात. पण असे केल्याने मास्कसारखा लुक येतो. यामुळे अशी चूक न करता तुमच्या त्वचेच्या टोनशी जुळणारा फाउंडेशन लावावे. यामुळे तुमच्या सौंदर्यामध्ये भर पडेल.
* जर तुम्ही जास्त कन्सीलर वापरत असाल तर अगदी बारीक रेषाही हायलाइट होतील, त्यामुळे जास्त कन्सीलर वापरणे टाळा.
* आयब्रो करताना केसांशी जुळणारी पेन्सिल वापरावी.
* डोळ्यांचा मेकअप करताना शिमरचा वापर टाळावा.
* काळ्या आयलायनर ऐवजी ब्राउन रंगाचा आयलायनर लावल्यास तुम्हाला परफेक्ट लुक मिळतो. तुम्ही केसांना हायलाइट्स करून ट्रेंडी लुक देऊ शकता.
* आयलायनर परफेक्ट लावल्यास चेहरा आणि डोळे अधिक सुंदर दिसतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Monsoon Makeup Tips for Last Longer effect check details 14 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Monsoon Makeup Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या