22 November 2024 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Quick Makeup Hacks | मेकअप करायचा आहे पण तुमच्याकडे फार कमी वेळ आहे? तर मग या टिप्स वापरुन 5 मिनिटांत व्हा रेडी

Quick Makeup Hacks

Quick Makeup Hacks | ऑफिसला जाताना किंवा कॉलेज अथवा रोजच्या रुटीनमध्ये पटपट तयार होणं फार कठीण आहे. मुलींना नो मेकअप लूकमध्ये देखील अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे फक्त ५ मिनिटांमध्ये तयार कसं व्हायचं असा प्रश्न सर्वच मुलींना पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फक्त ५ मिनिटांमध्ये तुम्ही तयार होऊ शकाल असा मेकअप सांगणार आहोत. विशेष म्हणजे हा मेकअप ५ मिनिटांमध्ये जरी होत असला तरी तो दिर्घकाळ देखील टिकून राहतो. चला तर मग या सोप्या आणि झटपट मेकअप विषयी जाणून घेऊ. (How to do simple daily makeup?)

1. मेकअपमध्ये सर्वात आधी कंसीलर लावावे. यासाठी एका छोट्या ब्रशचा वापर केल्यास उत्तम. हे कंसीलर फक्त तुमच्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी डाग आहेत अशाच ठिकाणी लावा. काम आणखीन झटपट व्हावं यासाठी तुम्ही हाताच्या बोटांनी देखील कंसीलर अप्लाय करू शकता.

2. कंसीलर लावल्यावर चेहरा सुका किंवा सॉफ्ट दिसण्यासाठी त्यावर थोडी पावडर अप्लाय करा. ही पावडर तुम्हाला हवी त्या कंपनीची तुम्ही वापरू शकता. पावडर लावताना ती हाताने लावने शक्यतो टाळा. एखाद्या फ्लफी ब्रशच्या सहाय्याने पावडर लावल्यास तुम्ही आणखी सुंदर दिसाल.

3. आय-मेकअप करताना एक नेहमी तुमच्या चेहऱ्याच्या रंगाशी मिळत्या रंगाची शेड निवडा. यामध्ये तुम्ही न्यूड रंगाचा आयशॅडो वापरू शकता. त्याने तुमच्या चेहऱ्यावर आणखीन ग्लो येईल.

4. चेहऱ्याला मेकअप असल्याने अशावेळी डोळ्यांच्या मेकअपसाठी तुम्ही काजळचा वापर करु शकता. थोडेसे काजळ घेऊन तुम्ही ते डोळ्यांच्या दोन्ही बाजूंना लावू शकता. त्याने तुमचे डोळे आणखीन आकर्शक दिसतील.

5. हा मेकअप करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की यावेळी तुमचा चेहरा पूर्णता कोरडा असेल. त्वचा जास्त कोरडी झाली असेल तर तुम्ही चेहरा धुतल्यानंतर लगेचच एखादं मॉश्चराइजर अप्लाय करा. त्याने त्वचा जास्त कोरडी पडणार नाही. मेकअपसाठी जशी त्वचा हवी तशी तयार होईल.

6. चेहऱ्याला मेकअप असेल आणि तुम्ही डीपनेक ड्रेस परिधान केला असेल तर अशा वेळी तुमच्या मानेला देखील थोडे मॉश्चराइजर अप्लाय करा.

7. यामध्ये तुम्ही पॉन्टस या कंपनीची क्रिम अथवा बीबी क्रिम देखील वापरू शकता. त्याने चेहऱ्यावर आणखीन तेज येईल.

8. चेहऱ्याचा हा संपूर्ण मेकअप झाल्यावर सर्वात शेवटी ओठांवर हलके लिप ग्लॉस लावा. त्यानंतर तुम्ही हलक्या आणि फिकट अशा रंगाची लिपस्टीक लावा. लिप्सटीकचा रंग तुमच्या चेहऱ्याशी मिळताजुळता असल्यास आणखीन उत्तम. तर अशा टीप्स फॉलो केल्यास अवघ्या ५ मिनिटांमध्ये तुम्ही तयार व्हाल.

News Title: Quick Makeup Hacks How can I do my makeup super fast details on 02 April 2023.

हॅशटॅग्स

#Quick Makeup Hacks(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x