27 December 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | मल्टिबॅगर HUDCO सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: HUDCO Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
x

Teeth Care Tips | रोज ब्रश केल्यावरही अनेक वेळा दात पिवळे दिसतात, घरगुती टिप्स फॉलो करून दातांचा पिवळेपणा करा दूर

Teeth Care Tips

Teeth Care Tips | प्रत्येक स्त्रीला वाटते की, आपली त्वचा सुंदर व चमकदार असावी. मात्र चेहऱ्याची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी स्त्रीया अनेक पद्धतींचा अवलंब करतात, परंतु अनेकदा दात स्वच्छ करणे विसरून जातात. रोज ब्रश केल्यावरही अनेक वेळा दात पिवळे पडू लागतात, तर दात पिवळे पडल्याने तुमचे व्यक्तिमत्वही फिके पडते. चेहऱ्याप्रमाणेच दातही आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य तुमच्या सुंदर दातांवर अवलंबून असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशा परिस्थितीत दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करून पाहू शकता. तर चला खाली माहिती वाचूयात.

तमालपत्र :
तमालपत्र हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा मसाला पदार्थ आहे, त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर करू शकता. तमालपत्राची कोरडी पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट आठवड्यातून तीनदा दातांवर लावा आणि दातांमधले साठे काढून टाकण्यास ते मदत करू शकतात.

कडुलिंबाचे झाड :
कडुलिंब आपल्या आरोग्यासाठी तसेच दातांसाठी खूप फायदेशीर आहे, दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी कडुलिंबाचा वापर करा. कोमट पाण्यात धुवा आणि दररोज त्याचा वापर करा.

हिंग :
हिंग तुम्हाला दातांचा पिवळेपणा दूर करण्यास मदत करू शकते. अर्धा कप पाण्यात दोन चिमूट हिंग उकळून घ्या हे पाणी थंड करून दिवसातून दोनदा गुळण्या करा.

स्ट्रॉबेरी :
स्ट्रॉबेरी दातांसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. स्ट्रॉबेरी दातांमध्ये चोळून किंवा खाल्ल्यानेही दात पांढरे होतात. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर करतात.

मोहरीचे तेल आणि हळद :
हळद हे नैसर्गिक प्रतिजैविक आहे. याचा वापर काप, जखमा, सूज, वेदना इत्यादीसाठी करण्यात येतो. मोहरीच्या तेलात हळद मिसळल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो व यासाठी प्रथम अर्धा चमचा हळद पाव चमचा मोहरीच्या तेलात मिसळा आणि आता हे मिश्रण रोज दातांवर लावा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Teeth Care Tips Checks details 4 October 2022

हॅशटॅग्स

Teeth Care Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x