15 January 2025 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुलींसारखी पांढरी शुभ्र त्वचा हवी? तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे या ट्रिक्स फॉलो करा

Toner for Face

Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुली अतिशय नाजूक आणि सुंदर दिसतात. त्यांचा चेहरा इंडियन स्किन टोनपेक्षा अतिशय वेगळा आहे. गोऱ्या पान आणि तुकतुकीत कांती असलेल्या या साऊथ कोरियाच्या मुली चेहऱ्याच्या काळजीसाठी तांदुळाचा जास्त प्रमाणात वापर करतात. तसं पाहायला गेलं तर, कोरियामधील मुलींची त्वचा त्याच्या खाणपानामुळे आधीपासूनच चांगली असते.

परंतु भारतामधील मुलींची त्वचा यलो अंडरटोनकडे वळलेली असते. त्यामुळे डल झाल्यानंतर त्वचा लगेचच काळपट दिसते. हा काळपटपणा, उन्हापासून झालेलं टॅनिंग दूर करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा कशा पद्धतीने वापर करावा हे ब्युटी तज्ञ एलेन चौधरी यांनी सांगितलं आहे. चला तर जाणून घेऊया.

प्रत्येकाच्या घरामध्ये भात शिजतो. बहुतांश भारतीय भात खातात. त्यामुळे तांदूळ अगदी सहजरीत्या घरामध्ये उपलब्ध असतो. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तांदळाच्या पाण्याचं टोनर तयार करायचं आहे आणि हे टोनर दररोज वापरायचं देखील आहे. टोनर तयार करण्यासाठी तुम्हाला एक कप तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. या कपामध्ये पाणी ऍड करून दोन तास तांदूळ भिजत घालायचे आहेत.

दोन तास झाल्यानंतर पाणी एकाच स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. तुम्ही हे पाणी लगेचच वापरू शकत नाही यासाठी तुम्हाला आणखीन दोन दिवस पाणी एका जागेवर तसंच ठेवायचं आहे. दोन दिवस उलटून गेल्यानंतर तुम्ही हे पाणी चेहऱ्यासाठी एका टोनरच्या स्वरूपात वापरू शकता.

तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे टोनर दिवसातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर स्प्रे करायचं आहे. स्प्रे केलेलं टोनरचं पाणी तुम्हाला धुऊन काढायचं नाहीये. ते तसंच रात्रभर ठेवायचं आहे तरच तुमच्या चेहऱ्याला तांदळाच्या पाण्याचे फायदे होतील.

तांदळाच्या पाण्यामध्ये फेरूलिक ऍसिड आणि इनोसिटॉल आढळते. जे चेहऱ्यासह तुमच्या केसांसाठी देखील अतिशय उत्तम आहे. कोरियामधील मुली तांदळाच्या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी देखील करतात. तुम्ही देखील हे पाणी केसांसाठी वापरू शकता. पाण्यामध्ये आढळणाऱ्या इनोसिटॉलमध्ये नैसर्गिक साखरेचे गुणधर्म आढळतात. ही साखर आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर असते आणि म्हणूनच तांदळाच्या पाण्याचा वापर चेहऱ्यासाठी करणं फायद्याचं मानलं जातं.

News Title : Toner for Face beauty 29 August 2024.

हॅशटॅग्स

#Toner for Face(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x