15 January 2025 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

True Beauty | रेडियंट ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा अभिनेत्री शरवरी वाघच्या ब्युटी टिप्स, चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल

Highlights:

  • मॅजिकल ड्रिंक
  • घरातील या गोष्टींचा करते वापर
  • हार्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी करते हे काम
True Beauty

True Beauty | अभिनेत्रींपासून ते सर्वसामान्य महिलांपर्यंत प्रत्येकीलाच आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायला फार आवडते. अशातच बऱ्याच अभिनेत्री केमिकल प्रॉडक्टपासून स्वतःच्या चेहऱ्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे शरवरी वाघ. शरवरी चेहर्यासाठी कायम नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करते. आज आम्ही तुम्हाला या बातमीपत्रातून शरवरीच्या ब्युटी सिक्रेट बद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही सुद्धा एखाद्या बॉलीवूड अभिनेत्री सारख्याच सुंदर दिसू लागल.

मॅजिकल ड्रिंक
शरवरीने तिच्या लाईफस्टाईलमध्ये एक मॅजिकल ड्रिंक घेणं सुरू केलं आहे. हे मॅजिकल ड्रिंक काकडी, पुदिना, आवळा आणि पालक या सुपरफूडपासून तयार होते. काकडीमुळे तुमचा शरीर संपूर्ण दिवस हायड्रेट राहते ज्यामुळे तुम्ही डीहायड्रेशनपासून वाचता. त्याचबरोबर पालकमध्ये देखील भरपूर प्रमाणात विटामिन उपलब्ध असतात. ज्यामुळे चेहऱ्याचा पोत सुधारण्यास मदत होते.

घरातील या गोष्टींचा करते वापर
शरवरी चेहऱ्यावरील डेड स्किन रिमुव्ह करण्यासाठी तूप आणि साखर मिक्स करून चेहऱ्याला लावते. तिच्या म्हणण्याप्रमाणे तूप आणि साखर एका स्क्रबप्रमाणे काम करते. ज्यामुळे तुमची त्वचा बाहेरील केमिकल प्रॉडक्टपासून वाचेल. त्याचबरोबर ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी ती लिपकेअर रूटीन देखील करते. ओठांसाठी ती घरगुती स्क्रबच वापरते.

हार्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी करते हे काम
हार्मोन बॅलन्स राहण्यासाठी शरवरी वाघ व्यायाम करते. व्यायाम केल्यामुळे बॉडी देखील फिट राहते. शरवरी एका आठवड्यातून पाच वेळा व्यायाम करणं पसंत करते. सोबतच वेट ट्रेनिंग आणि पिलेट्स ट्रेनिंग देखील शरवरी करते आणि जास्त बिझी शेड्युल असल्यावर ती सूर्यनमस्कार देखील घालते.

Latest Marathi News | True Beauty Tips Sharvari Wagh Beauty 12 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#True Beauty(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x