22 November 2024 7:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Turmeric Face Toner Tips | घरीच बनवा हळदीचा टोनर, पार्लरमध्ये पैसे खर्च न करता सुंदर आणि चमकदार चेहरा बनवा

Turmeric Face Toner Tips

Turmeric Face Toner Tips | पुरुष अथवा स्त्री आपला चेहरा सुंदर दिसावा हे प्रत्येकाला वाटने साहजिक आहे. सुंदर आणि निष्कलंक चेहरा केवळ स्वतःलाच छान दिसत नाही, तर सर्वांच्या नजरा अशा चेहऱ्यावर खिळून राततात. सुंदर चेहऱ्यासोबतच निरोगी त्वचा असणेही खूप महत्त्वाचे आहे, आणि सध्या सणासुदीचा काळ सुरू असताना चमकदार आणि सुंदर त्वचा ही प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हालाही निर्दोष आणि स्वच्छ त्वचा मिळवायची असेल, तर हळदीचा टोनर तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. हळदीचा टोनर त्वचेला खोलवर स्वच्छ करतो, तसेच त्वचेवरील डाग, मुरुम आणि सुरकुत्या देखील कमी करतो.

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या हळदीचे आपल्या त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध, हळद मुरुम आणि चेहऱ्यावरील डागांपासून मुक्त होण्यास देखील मदत करते तर हे चेहर्‍यावर लाइटनिंग एजंट म्हणून काम करते आणि त्वचेवरील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी मदत करते. टोनर म्हणून हळद वापरणे खूप फायदेशीर आहे.

हळद टोनरच्या मदतीने आपण उघडे छिद्र बंद करू शकतो. यामध्ये असलेले ब्लीचिंग गुणधर्म त्वचेला ग्लो आणतात आणि याच्या वापरामुळे त्वचा घट्ट होते व त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते. हळदीचा टोनर त्वचेच्या संसर्गापासून बचाव करतो. असे उपयुक्त टोनर कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.

हळद टोनर कसा बनवायचा:

साहित्य :
कच्ची हळद, कोरफड जेल, गुलाब पाणी, ग्रीन टी, पाणी आणि लिंबाचा रस.

प्रक्रिया:
* हळद टोनर तयार करण्यासाठी, प्रथम एक ग्लास पाणी गरम करून घ्या.
* पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये हळद, कोरफड जेल, गुलाबपाणी, ग्रीन टी आणि लिंबाचा रस घालून बाटलीमध्ये भरून ठेवा.
* हे टोनर वापरण्यासाठी, प्रथम आपला चेहरा स्वच्छ करून घ्या.
* यानंतर चेहऱ्यावर हळद टोनर लावून चेहऱ्याला मसाज करून घ्या.
* मसाज केल्यानंतर, कोमट पाण्याने चेहरा धुवा, नंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Turmeric Face Toner Tips Checks details 02 April 2023.

हॅशटॅग्स

Turmeric Face Toner Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x