2 February 2025 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो, ही SBI म्युच्युअल फंड योजना महिना 3500 रुपये SIP वर देईल 2 कोटी रुपये परतावा New Income Tax Slab | 12 लाख ते 50 लाख रुपये उत्पन्नावर किती टॅक्स भरावा लागेल आणि बचत किती होईल जाणून घ्या Smart Investment | तुमचा महिना पगार कितीही असला तरी 'या' 3 पर्यायांमध्ये पैसे गुंतवा, कधीच आर्थिक कोंडी होणार नाही 5G Smartphone | स्मार्टफोन प्रेमींनो 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा बजेट तयार ठेवा, कोणते नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार CIBIL Score | 'या' 6 सोप्या स्टेप्समुळे तुमचा सिबिल स्कोर भराभर वाढवेल, 500 हून थेट 800 चा आकडा गाठेल, असं शक्य होइल Home Loan EMI | वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेण्याचा प्लॅन करताय, मग, या 4 गोष्टी लक्षात ठेवा, कर्जाचा डोंगर हलका होईल Mutual Fund SIP | 50 लाखांचे घर खरेदी करताय, मग किती रुपयांची SIP करावी लागेल, मोठी रक्कम कशी मिळेल पहा
x

5G Smartphone | स्मार्टफोन प्रेमींनो 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा बजेट तयार ठेवा, कोणते नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार

5G Smartphone

5G Smartphone | 2025 या नवीन वर्षात नवनवीन स्मार्टफोनची धमाकेदार लॉन्चिंग पहिल्याच महिन्यात झाली आहे. प्रसिद्ध कंपन्या हळूहळू आपले नवनवीन मॉडल्स एकेक करून लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान स्मार्टफोन प्रेमींसाठी आम्ही एक अत्यंत खुशखबर घेऊन आलो आहोत. जर तुमचा यावर्षी नवीन ते सुद्धा ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर, लवकरात लवकर आम्ही सांगितलेली ही लिस्ट पहा. पुढच्या महिन्यात लॉन्च होऊ शकतात हे 3 जबरदस्त स्मार्टफोन.

Samsung Galaxy A56

सॅमसंग गॅलेक्सीने नुकताच S25 हा जबरदस्त मॉडेल लॉन्च केला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तरुणांची लाईन लागलेली आहे. सॅमसंग कंपनीने हे जबरदस्त मॉडेल दिल्यानंतर आता ‘सॅमसंग गॅलेक्सी A56’ हे नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या मार्गावर आहे. फेब्रुवारी महिन्यात स्मार्टफोन लॉन्च होणार असून अजून स्मार्टफोनची खरी तारीख कंपनीने जाहीर केली नाहीये.

लॉन्च होणाऱ्या या अपकमिंग सॅमसंग गॅलेक्सी मॉडेल्सचे फीचर्स अत्यंत कमालीचे असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 50MP चा मुख्य कॅमेरा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP चा जबरदस्त कॅमेरा देण्यात येणार आहे. बरेच स्मार्टफोन प्रेमी सॅमसंग गॅलेक्सीच्या नवीन मॉडेलची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Realme P3 Pro

रियलमी देखील आपले अपकमिंग मॉडेलवर सध्या काम करत आहे. या मॉडेलचे नाव ‘रियलमी P3 pro’ असं असणार आहे. हा स्मार्टफोन अगदी मध्यम बजेट असणारे व्यक्ती देखील खरेदी करू शकणार आहेत. स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे झाल्यास 7 Gen 3 प्रोसेसरसह हा स्मार्टफोन सज्ज केला जाऊ शकतो. दरम्यान या स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप 5,500mAh एवढा असू शकतो. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 50MP OIS चे मुख्य सेन्सर असण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी देखील अत्यंत जबरदस्त असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 20000 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Vivo V50

विवोची V ही सिरीज कॅमेरा कॉलिटीसाठी आणि नवनवीन फीचर्ससाठी प्रचंड लोकप्रिय आहे. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींच्या हातामध्ये विवोची V सिरीज पाहायला मिळते. सध्या विवो कंपनी ‘विवो V50’ हे नवे मॉडेल लॉन्च करण्याच्या मार्गावर आहे. जबरदस्त प्रोसेसर आणि 6000mAh बॅटरी बॅकअपसह विवोचा हा स्मार्टफोन सुसज्ज करण्यात येणार आहे. 50MP चा मुख्य कॅमेरा त्याचबरोबर 50MP अल्ट्रावाईड अँगल लेन्स या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | 5G Smartphone Sunday 02 February 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#5G Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x