17 November 2024 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Apple iPhone 11 | फ्लिपकार्टवर आयफोन 11 खरेदी करा फक्त 23490 रुपयांत, डिस्काऊंटची संपूर्ण माहिती

Apple iPhone 11

Apple iPhone 11 | अॅपलने यंदा आयफोन १४ सीरिजचे अनेक स्मार्टफोन बाजारात आणले. यामध्ये आयफोन १४, आयफोन १४ प्लस, आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स हँडसेटचा समावेश आहे. या सीरिजच्या अॅपलच्या प्रो व्हेरिएंट स्मार्टफोनमध्ये अॅपलचा लेटेस्ट चिपसेट आहे, तर बाकीच्या व्हेरिअंटमध्ये जुना चिपसेट आहे. ज्यामुळे ज्यांच्याकडे आयफोन ११ किंवा त्याहून अधिक आहे त्यांना नुकत्याच लाँच झालेल्या आयफोन १४ सीरिजच्या हँडसेटवर अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही, असा सल्ला तज्ज्ञाने दिला आहे.

आयफोन ११ आणि आयफोन १४ ची वैशिष्ट्ये बरीचशी समान आहेत. दोन्हीचा डिस्प्ले साइज आणि बॅटरी लाइफ जवळपास समान आहे. कॅमेरा सेटअपही अगदी सारखाच आहे. यावेळी तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आयफोन 11 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण फ्लिपकार्ट सध्या या आयफोनची विक्री केवळ 23,490 रुपयांच्या किंमतीत करत आहे.

स्वस्तात खरेदी करू शकता
आयफोन 11 च्या 64 जीबी मॉडेलची मूळ किंमत 43900 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टने हा आयफोन कमी किंमतीत विकण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर फ्लिपकार्टवर आयफोन 11 ची किंमत 40,990 रुपये झाली आहे. पण ही शेवटची किंमत नाही. जर तुम्ही हा आयफोन 11 योग्य ऑफर्स आणि डील्ससह खरेदी केला तर तुम्ही त्यावर मोठ्या प्रमाणात बचत करू शकता आणि असं केल्याने तुम्ही आयफोन 11 ला फक्त 23,490 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

फ्लिपकार्टने आयफोन ११ वर एक्सचेंज ऑफर अंतर्गत जास्तीत जास्त १७५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला आहे. एक्सचेंज ऑफरसह आयफोन प्रेमी केवळ 23,490 रुपयांच्या पेमेंटवर खरेदी करू शकतात. याशिवाय फ्लिपकार्टने निवडक बँकांसाठी 5 टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला आहे. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ऑनलाइन ग्राहक अतिरिक्त 5 टक्के सूट घेऊ शकतात. आयफोन 11 ची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Apple iPhone 11 offer on Flipkart check details here 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Apple iPhone 11(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x