11 January 2025 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Apple Watch Series 7 | प्री-बुकिंगला सुरुवात | ही आहे खासियत आणि किंमत

Apple Watch Series 7

मुंबई, 0९ ऑक्टोबर | अॅपल वॉच सिरीज 7 (Apple Watch Series 7) च्या प्री बुकिंगला सुरुवात झाली. मागील महिन्यात हे स्मार्टवॉच आयफोन 13 सिरीज, आयपॅड मिनी आणि न्यू आयपॅड सह लॉन्च करण्यात आले. आज संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून याच्या प्री-बुकिंगला सुरुवात होणार आहे. अॅपल इंडिया, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईटवरुन प्री-बुकिंग करता येईल. दरम्यान, हे स्मार्टवॉच 15 ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल, अशी माहिती अॅपल इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

Apple Watch Series 7. Pre-booking of Apple Watch Series 7 begins. Last month, the smartwatch was launched with the iPhone 13 series, iPad mini and new iPad :

मागील आठवड्यात वॉच सिरीज 7 च्या किंमतीबाबत Tipster Ishan Agarwal कडून खुलासा करण्यात आला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनचे 41mm साईजचे अॅल्युमिनियम मॉडल 41,900 रुपयांना तर 45mm मॉडल 44,900 रुपयांना उपलब्ध होईल.

तर 41 आणि 45mm चे सेल्युलर वेरिएंट अनुक्रमे 50,900 आणि 53,900 रुपयांना उपलब्ध असेल. त्याचबरोबर अॅपल वॉच सिरीज 7 स्टेनलेस (GPS + Cellular only) चे 41 आणि 45mm मॉडल्स अनुक्रमे 69,900 आणि 73,900 रुपयांना मिळेल.

अॅपलच्या या नव्या वॉच सिरीजमध्ये रेटिना डिस्प्ले, thin bezels आणि S6 chip देण्यात आलं आहे. हे स्मार्टवॉच 5 शेड्स मध्ये उपलब्ध आहे- green, blue, red, starlight आणि midnight. त्याचबरोबर हे वॉच crack, dust आणि water-resistant आहे. याला सॉफ्ट राऊंट कॉर्नर्स, रिडिझाईन बटण, फुल किपॅड, 18 तासांची बॅटरी लाईफ आणि USB-C चार्गिंग पोर्ट देण्यात आला आहे. अॅपल वॉच सिरीज 7 watchOS 8 out of the box वर कार्यरत आहे. यात हेल्थ ट्रॅकिंग फिचर देखील देण्यात आले आहे. याद्वारे ब्लड ऑक्सिजन पातळी, atrial fibrillation tracking आणि ECG याची माहिती मिळते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Apple Watch Series 7 Pre-booking begins in India.

हॅशटॅग्स

#ApplePhone(3)#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x