17 November 2024 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Infinix Zero 5G 2023 | इन्फिनिक्स Zero 5G स्मार्टफोन लाँच होतोय, 50MP कॅमेऱ्यासह मिळणार अनेक फीचर्स

Infinix Zero 5G 2023

Infinix Zero 5G 2023 | इन्फिनिक्स आपले नवे स्मार्टफोन इनफिनिक्स नोट 12i 2022 आणि इन्फिनिक्स झिरो 5G 2023 भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. नोट 12 आय 2022 हे कंपनीच्या नोट 12 आय हँडसेटचे रिफ्रेश व्हर्जन आहे. यामध्ये कंपनी अमोलेड डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी८५ प्रोसेसर देणार आहे. तर इन्फिनिक्स झिरो 5G 2023 हा स्मार्टफोन झिरो 5G चा रिफ्रेश व्हेरियंट आहे. यात तुम्हाला मिडियाटेक डायमेंसिटी 1080 चिपसेट पाहायला मिळेल. जुन्या व्हेरियंटमध्ये कंपनी डायमेंसिटी ९०० चिपसेट देत होती.

Infinix Zero 5G – फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये कंपनी 6.78 इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले देणार आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि ५०० नाइट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये येईल. प्रोसेसर म्हणून कंपनी यात मिडियाटेक डायमेंसिटी 1080 चिपसेट देणार आहे. फोटोग्राफीसाठी च्या या फोनमध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर चा समावेश आहे. सेल्फीसाठी तुम्हाला १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी कंपनी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 5000 एमएएच ची बॅटरी आहे, जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ओएसबद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रॉइड १२ वर आधारित एक्सओएस १२ वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि मायक्रो एसडी कार्डसह सर्व स्टँडर्ड पर्याय आहेत.

इनफिनिक्स नोट 12i 2022 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये तुम्हाला फुल एचडी+ रिझोल्यूशनसह 6.7 इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 60 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि 1000 नाइट्सची पीक ब्राइटनेस लेव्हल सपोर्ट करतो. हा हँडसेट ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये येईल. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये माली जी५२ जीपीयूसह मीडियाटेक हीलियो जी८५ देणार आहे.

ट्रिपल कॅमेरा सेटअप
फोनच्या रियरमध्ये कंपनी ट्रिपल कॅमेरा सेटअप देणार आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि क्यूव्हीजीए एआय लेन्स चा समावेश आहे. सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा पाहायला मिळणार आहे. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 5000 एमएएच ची आहे, जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ओएसबद्दल बोलायचे झाले तर हे अँड्रॉइड 12 वर आधारित एक्सओएस 10.6 वर काम करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Infinix Zero 5G 2023 smartphone price in India check details on 14 January 2023.

हॅशटॅग्स

#Infinix Zero 5G 2023(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x