iPhone 15 Smartphone | आयफोन 15 लवकरच बाजारात लाँच होणार, तारखेसह महत्वाची माहिती इंटरनेटवर व्हायरल
iPhone 15 | युथ जनरेशन मध्ये Apple चे लव्हर आपल्याला पहायला मिळतील. जे मोबाईल लॉन्च झाल्याच्या काही वेळामध्येच Apple iPhone खरेदी करतात. गेल्या 7 सप्टेंबर रोजी Apple चा iPhone 14 लॉन्च झाला आहे. मात्र Apple चाहते आता iPhone 15 ची वाट पाहत आहेत. दरम्यान, iPhone 15 बद्दल काही अंदाज बांधले जात आहेत आणि iPhone 15 मध्ये यावेळी बरंच काही नवीन पाहायला मिळणार असल्याच्या अफवा देखील पसरवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी iPhone 14 लाँच करण्यापूर्वी यूजर्सने Apple ला नॉच काढायला सांगितले होते आणि Apple ने ते काढून डायनॅमिक आयलंड लाँच केले होते. मात्र आता iPhone 15 च्या स्पेसिफिकेशनबद्दलही अनेक दावे इंटरनेटवर व्हायरल होतं आहेत तसेच लीकमध्ये फोन 15 लॉन्च डेटचाही दावा केला जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या केल्या कॅन्सल
दरम्यान, आता असे समोर येत आहे की, MacRumours मिल्टन केन्स यांच्या मते, UK मधील Apple Store च्या कर्मचार्यांना 15 सप्टेंबर 2023 ते 7 ऑक्टोबर 2023 आणि 2 डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 पर्यंत सुट्टी घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तर तुम्ही यावरून अंदाज लाऊ शकता की Apple या दरम्यान आपली पुढील फ्लॅगशिप iPhone 15 सीरीज लॉन्च करू शकते. MacRumours ने आपल्या अहवालामध्ये असेही म्हटले आहे की कर्मचार्यांना आम्ही यावेळी असेही सूचित केले की या काळामध्ये स्टोअरमधील कोणत्याही कर्मचार्याची सुट्टी स्टोअर व्यवस्थापकाकडून मंजूर केली जाणार नाहीये. मात्र आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, थोड्या दिवसांमध्ये iPhone 15 सीरीज लॉन्च होते का.
iPhone 15 बद्दलच्या अफवा
गेल्या काही दिवसांपासून Apple चा iPhone 15 बाबत अफवा पसरवल्या जात आहेत. याशिवाय ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यावेळी म्हणाले की, अॅपल आगामी काळामध्ये रणनीती बदलू शकतो. विशेषत: प्रो मॅक्स आवृत्तीसाठी, दुसरे नाव निश्चित केले जाऊ शकते तसेच पुढील वर्षी, आयफोन 15 प्रो मॅक्स ऐवजी आयफोन 15 सीरीजमध्ये आयफोन 15 अल्ट्रा देखील सादर केला जाऊ शकतो. यासोबतच Apple Watch Ultra चे नाव बदलले जाऊ शकते. याची Apple चाहत्यांनी खात्री करून घ्यावी.
मोबाईलची किंमत वाढणार
दरम्यान, प्रसिद्ध टिपस्टर LeaksApplePro ने देखील या बाबतमध्ये पुष्टी केली आहे आणि त्यानुसार Apple ने 8K रेकॉर्डिंगवर काम सुरू केले आहे आणि ते iPhone 15 सीरीजमध्ये लॉन्च केले जाऊ शकते. LeaksApplePro च्या मते, Apple पुढील वर्षी iPhone 15 Ultra ची किंमत $1,199 पर्यंत वाढू शकते. म्हणजेच, या वर्षीच्या तुलनेमध्ये पुढील वर्षी किमतीत मोठी उडी मारली जाऊ शकते. या वर्षी iPhone 14 Pro Max ची किंमत $1,099 आहे. तथापि, असा अंदाज लावला जात होता की iPhone 14 Pro मॉडेल्सच्या किंमतीत $100 पर्यंत वाढ होऊ शकते, पण किंमतींमध्ये वाढ झाली नाही.
iPhone 15 ची बॅटरी बॅकअप वाढला
अनेकदा अफवा समोर येत आहेत की आयफोनची बॅटरी 3-4 तासांनी वाढवली जाऊ शकते. तसेच शेवटी ती लाइटनिंग पोर्ट ऐवजी यूएसबी-सी पोर्टवर येऊ शकते आणि या वर्षीच्या iPhone मॉडेलप्रमाणे, iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये A16 Bionic असू शकते. तर iPhone 15 Pro आणि iPhone 15 Ultra मध्ये A17 Bionic असण्याची शक्यता आहे तर LeaksApplePro अहवालामध्ये पुढे असेही म्हटले आहे की डायनॅमिक आयलँड नॉच फक्त प्रो मॉडेल्समध्ये दिसेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: iPhone 15 smartphone information leak on internet checks details 12 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC