17 April 2025 10:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

iPhone 16 | iPhone16 सीरिजची विक्री सुरू, सर्वच शहरांमध्ये ॲपल स्टोअरवर लांबच लांब रांगा, फीचर्स नोट करा - Marathi News

Highlights:

  • iPhone 16
  • आयफोन 16 मॉडेलची किंमत किती आहे?
  • आयफोन 16 मध्ये नवीन काय आहे?
iPhone 16

iPhone 16 | आयफोन 16 सीरिजची विक्री आज म्हणजेच शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 पासून भारतासह जगभरात सुरू झाली आहे. दिल्ली, मुंबईतील ॲपलस्टोअर्स सकाळपासूनच ग्राहकांसाठी खुले आहेत. रिपोर्टनुसार, लेटेस्ट आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स खरेदी करणाऱ्यांच्या या स्टोअर्सवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

नवीन पिढीची आयफोन सीरिज यावर्षी 9 सप्टेंबर रोजी ॲपलच्या वार्षिक इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आली होती. याची प्री-बुकिंग 13 सप्टेंबरपासून (iPhone 16 Launch Date) सुरू होणार आहे. आयफोनप्रेमी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे प्रीमियम हँडसेट खरेदी करू शकतात.

ॲपलने आपला लेटेस्ट आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स (Apple iPhone 16 Pro Max – iPhone 16 Pro Max) लाँच केला होता. आयफोन 16 सीरिजचे प्री-बुकिंग आठवडाभरापासून सुरू असून आता त्याची शिपिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

आयफोन 16 मॉडेलची किंमत किती आहे?
भारतीय बाजारात आयफोन 16 च्या बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. आयफोन 16 प्लस 89,900 रुपये, आयफोन 16 प्रो 1,19,900 रुपये आणि आयफोन 16 प्रो मॅक्स 1,44,900 रुपयांना खरेदी करता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन 16 सीरिजमध्ये ॲपल इंटेलिजन्स फीचर मिळत नाही.

तर यावर्षी जूनमध्ये वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्स (WWDC 2024) मध्ये एआय फीचरसह त्याचे अनावरण करण्यात आले होते. ॲपल इंटेलिजन्स फीचर नसल्यामुळे आयफोन 16 सीरिजच्या मालकांना सॉफ्टवेअर अपडेटची वाट पाहावी लागणार आहे. आशा आहे की, येत्या आठवडे आणि महिन्यांत लोकांना हळूहळू आयफोन 16 मध्ये अपडेट मिळेल.

आयफोन 16 मध्ये नवीन काय आहे?
नवीन आयफोन 16 मध्ये कॅमेरा कंट्रोल बटनसारखे काही किरकोळ हार्डवेअर अपग्रेडस देण्यात आले आहेत. फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करणे सोपे व्हावे यासाठी हे नवीन बटण डिझाइन करण्यात आले आहे. याशिवाय आयफोनच्या मागील जनरेशनच्या फोनप्रमाणेच यातही अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, आयफोन 15 प्रो मॉडेलवरील अॅक्शन बटण अद्याप आयफोन 16 मॉडेलवर उपलब्ध आहे.

Latest Marathi News | Apple iPhone 16 Price in India 21 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#iPhone 16(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या