15 January 2025 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Itel A23S Smartphone | भारतात ITEL A23S स्मार्टफोन लाँच, किंमत 5299 रुपये, फीचर्स जाणून घ्या

Itel A23S Smartphone

Itel A23S Smartphone | आपल्या बजेट स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असलेल्या इटेल या ब्रँडने भारतात आणखी एक एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन इटेल ए 23 एस लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये सर्व बेसिक फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्हाला मर्यादित बजेटमध्ये स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही तो खरेदी करू शकता. 4जी सक्षम स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा एफडब्ल्यूव्हीजीए डिस्प्ले असून 480×854 पिक्सल रिझॉल्युशन आहे.

हे फीचर्स मिळतील :
फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह १.४ गीगाहर्ट्झ क्वाड कोअर (एससी९८३२ ई) प्रोसेसर देण्यात आला आहे. हे आणखी ३२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. यात मायक्रोएसडी कार्डसाठी एक समर्पित स्लॉट देखील आहे. या फोनमध्ये ३०२० एमएएचची बॅटरी आहे. यात एलईडी फ्लॅशसह २ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी एलईडी फ्लॅशसह फ्रंटला व्हीजीए कॅमेरा दिला आहे.

१४ अतिरिक्त भारतीय भाषांना सपोर्ट :
आयटेल ए २३ एस स्मार्टफोन इंग्रजी आणि हिंदी, गुजराती, तमिळ, तेलगू, पंजाबी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, काश्मिरी, उर्दू, नेपाळी, मराठी आणि उडियासह १४ अतिरिक्त भारतीय भाषांना सपोर्ट करतो. या फोनमध्ये सुरक्षेसाठी फेस अनलॉक फीचर देखील देण्यात आले आहे. यात ड्युअल ४जी व्हीओएलटीई आणि वाय-फाय, ब्लूटूथ ४.२ असे अनेक कनेक्टिविटी पर्याय उपलब्ध आहेत.

कलर पर्याय आणि किंमत :
हा फोन अँड्रॉयड ११ गो वर चालतो आणि सोशल टर्बो फीचरने सुसज्ज आहे, ज्यात व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंग, पीक मोड, कॉल अलर्ट आणि स्टेटस सेव्हचा समावेश आहे. आयटेल ए २३ एस स्काय सायन, स्काय ब्लॅक, ओशन ब्लू या ३ रंगात येते आणि याची किंमत ५२९९ रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Itel A23S Smartphone launched check price details 26 July 2022.

हॅशटॅग्स

#Itel A23S Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x