22 February 2025 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Lenovo M10 Plus 3rd Gen Tablet | लेनोवोने M10 प्लस टॅबलेट लाँच केला, किंमत फक्त 19,999 रुपये, वैशिष्ट्यांसह सर्व तपशील

Lenovo M10 Plus 3rd Gen

Lenovo M10 Plus 3rd Gen Tablet | लेनोवोने गुरुवारी आपला नवा टॅबलेट टॅब एम १० प्लस (थर्ड जनरेशन) लाँच केला आहे. चिनी टेक जायंट लेनोवो टॅब एम १० प्लस (थर्ड जेन) चे हे नवीन डिव्हाइस कंपनीच्या टॅब्लेट पोर्टफोलिओमध्ये लेटेस्ट अॅडिशन आहे. या अँड्रॉईड टॅबलेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट मिळतो, ज्यात 10.61 इंचाचा 2K IPS LCD डिस्प्ले आहे. कंपनीचा दावा आहे की, या डिव्हाईसमध्ये युजर्संना पॉवरफुल प्रोसेसरसह बेस्ट इन क्लास मल्टीमीडिया एक्सपीरियंस मिळेल. जाणून घेऊया या नव्या लॅपटॉपमध्ये काय खास आहे.

किंमत आणि उपलब्धता :
लेनोवो टॅब एम १० प्लस (थर्ड जनरेशन) दोन प्रकारात येतो. पहिला व्हेरिएंट फक्त वाय-फाय आहे आणि दुसरा एलटीई आहे. याच्या वाय-फाय ओन्ली वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आणि एलटीई व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लिनोव्होचा नवा अँड्रॉइड टॅबलेट अॅमेझॉन इंडिया आणि लेनोवोच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे ऑफलाइन स्टोअर्सवर देखील उपलब्ध असेल. स्टॉर्म ग्रे आणि फ्रॉस्ट ब्लू या दोन कलर ऑप्शनमध्ये हे सादर करण्यात आले आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
* Lenovo Tab M10 Plus (थर्ड जनरेशन) मध्ये 15:9 आस्पेक्ट रेशियो, 2,000 x 1,200 पिक्सल, 10-पॉइंट मल्टी-टच आणि 400 निट्स पीक ब्राइटनेससह 10.61 इंचाचा 2K IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.
* टॅब्लेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेट ४ जीबी एलपीडीडीआर ४ एक्स रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरीसह जोडला जातो, जो मायक्रोएसडीद्वारे १ टीबी पर्यंत वाढवता येतो.
* लेनोव्होचा दावा आहे की टॅब एम १० प्लस (थर्ड जनरेशन) चे वजन सुमारे ४६५ ग्रॅम आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर फ्रंट आणि रिअर असे दोन्ही कॅमेरे ८ एमपीचे आहेत.
* या टॅबलेटमध्ये ७,७०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. लेनोवो टॅब एम १० प्लस (थर्ड जनरेशन) ४ आठवडे स्टँडबाय टाइम, ६० तास म्युझिक प्लेबॅक, १२ तासांसाठी ऑनलाइन व्हिडिओ प्लेबॅक आणि १४ तास वेब ब्राउजिंग ऑफर करते.
* इतर सेन्सरमध्ये एक्सेलेरोमीटर सेन्सर, एम्बियंट लाइट सेन्सर, जायरोस्कोप सेन्सर आणि हॉल सेन्सरचा समावेश आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Lenovo M10 Plus 3rd Gen tablet launched check price details 30 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Lenovo M10 Plus 3rd Gen(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x