Meta Smartwatch Coming Soon | ॲपलला टक्कर देण्यासाठी 'मेटा स्मार्टवॉच' लाँच होणार

मुंबई, 29 ऑक्टोबर | फेसबुकने नुकतेच आपल्या कंपनीचे ‘मेटा‘ असे नवीन नाव जाहीर केले आहे. त्यानंतर मेटा लवकरच आपले पहिले स्मार्टवॉच लॉन्च करू शकते असा दावा करत अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यासोबतच अनेक फोटोही लीक झाले आहेत. यामध्ये ते स्मार्टवॉच असेल यात शंका नाही असं म्हटलं जातंय. पण स्मार्टवॉच लॉन्च करण्याबाबत (Meta Smartwatch Coming Soon) कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
Meta Smartwatch Coming Soon. Facebook has recently announced the new name of its platform. Since then, several reports have surfaced, claiming that Meta may soon launch its first smartwatch. Along with this, many photos have also been leaked :
ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की मेटाचे आगामी स्मार्टवॉच रे-बॅन ग्लास अॅपमध्ये दिसले आहे. मात्र, यावरून स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांची माहिती मिळालेली नाही. रे-बॅन स्मार्ट ग्लास अनेक महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आला आहे. यात अंगभूत कॅमेरे आहेत, ज्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
लीक झालेला फोटो पाहता, मेटाच्या स्मार्टवॉचमध्ये गोलाकार कोपरा असलेला चौकोनी डायल आहे, ज्याचा लूक Apple वॉच सारखा आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर यात नॉच स्क्रीन आहे. अशा स्थितीत कॅमेरा घड्याळात असेल असे म्हणता येईल. याशिवाय स्पोर्ट्स मोड आणि कॉल-मेसेज नोटिफिकेशन्ससह हार्ट-रेट, ब्लड ऑक्सिजन आणि स्लीप ट्रॅकर ही वैशिष्ट्ये स्मार्टवॉचमध्ये दिली जाऊ शकतात. हे घड्याळ अँड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.
स्मार्टवॉच 2022 मध्ये लॉन्च होऊ शकते:
रिपोर्टनुसार, मेटा 2022 च्या सुरुवातीला आपले पहिले स्मार्टवॉच लॉन्च करू शकते. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लॉन्चबाबत कोणतेही अधिकृत संकेत दिलेले नाहीत. कनेक्ट कॉन्फरन्स दरम्यान, मार्क झुकरबर्गने 2022 मध्ये लॉन्च होणार्या हार्डवेअरबद्दल सांगितले. अशा परिस्थितीत मेटा स्मार्टवॉच जागतिक स्तरावर प्रथम लॉन्च केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. हे स्मार्टवॉच इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये अॅपलच्या वॉचला टक्कर देईल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Meta Smartwatch Coming Soon to compete with Apple.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN