23 November 2024 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Microsoft Chatbot Talk To Dead People | मृत्यू झालेल्या व्यक्तीसोबत बोलल्याचा भास करून देणारे मायक्रोसॉफ्टचे चॅटबॉट

Microsoft patented a chatbot

मुंबई, १५ सप्टेंबर | विज्ञान रोज नवनवीन कमाल करून दाखवित असते. आता हेच पहा ना, जे आता जगात नाहीत त्यांच्यासोबत बोलल्याचा भास करून देणारे चॅटबॉट मायक्रोसॉफ्टने तयार केले आहे. गेल्या महिन्यातच कंपनीने त्याचे पेटंट घेतले आहे. ही कल्पना अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही मालिका ब्लॅक मिररमधून सुचली आहे. यात मुख्य भूमिकेतील मुलगी तिच्या मृत प्रियकरासोबत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमधून घेतलेल्या माहितीच्या आधारे बोलत असते. जर तुम्हाला दिवंगत प्रसिद्ध गायक मुकेश, मोहंमद रफी, किशोर कुमार यांच्यासोबत संगीतावर चर्चा करायची असेल किंवा तुम्हाला स्वर्गीय आजीकडून सल्ला घ्यायचा असेल तर हे चॅटबॉटद्वारे सैद्धांतिक आधारे शक्य होईल.

Microsoft Chatbot Talk To Dead People, मृत्यू झालेल्या व्यक्तीसोबत बोलल्याचा भास करून देणारे मायक्रोसॉफ्टचे चॅटबॉट – Microsoft patented a chatbot that would let you talk to dead people :

या तंत्रज्ञानाच्या पेटंट दस्तऐवजानुसार ज्या दिवंगत व्यक्तीसोबत तुम्हाला बोलायचे असेल किंवा सल्ला घ्यायचा असेल त्याच्याशी संबंधित सर्व सोशल डेटा म्हणजे छायाचित्र, सोशल मीडिया पोस्ट, मेसेजेस, व्हॉइस डेटा किंवा त्यांनी लिहिलेली पत्रे याद्वारे चॅटबॉट त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वीकारेल आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. यातून तुम्हाला त्या व्यक्तीसोबत बोलत असल्याचे जाणवेल.

AI chat bots can bring you back from the dead, sort of :

चॅटबॉटची भाषाशैली, आवाजातील चढ-उतार आणि संवेदनाही अशा असतील की तुम्हाला त्या दिवंगत व्यक्तीसोबत असल्याचा भास होईल. तसेच चॅटबॉटमध्ये काही टूल्सचा वापर करून दिवंगत व्यक्तींचे २-डी आणि ३-डी इमेजसह फेशियल रिकग्निशन अल्गोरिदमचा वापर करून जिवंत चित्रही तुम्ही बनवू शकता. यातून तुम्हाला थेट त्यांच्याशी जोडले गेल्याचे जाणवेल. यातून आपल्याला वेगळ्याचा विश्वात गेल्याची अनूभूती मात्र मिळणार आहे. त्यामुळे विज्ञानाच्या जगतात येत्या काळात काय घडू शकेल याची कल्पनाच न केलेली बरी. यातून अनेक नवनव्या बाबी घडणार आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Microsoft patented a chatbot that would let you talk to dead people.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x