17 November 2024 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Mivi DuoPods F40 | कमी किमतीत खरेदी करा 50 तास बॅटरी लाइफसह Mivi DuoPods F40 इयरबड्स

Mivi DuoPods F40 Earbuds

Mivi DuoPods F40 Earbuds | आता भारतात ५० तासांपर्यंत बॅटरी लाइफ असलेले मिवी ड्युओपॉड्स एफ ४० इयरबड्स लाँच करण्यात आले आहेत. ‘लाँच डे’ ऑफर प्राइसवर पाच कलर ऑप्शन्ससह फ्लिपकार्ट आणि मिवी वेबसाइटवर इयरबड्स मिळू शकतात. ड्युओपॉड्स एफ ४० आयपीएक्स ४ वॉटर रेझिस्टंट रेटिंगसह येतो. इअरबड्सच्या बॅटरी केसमध्ये एलईडी स्क्रीन असते, ज्यामुळे युजर्सला किती बॅटरी वापरली गेली आहे हे समजते. तर मग चला अधिक माहिती जाणून घेऊया.

ऑफर नेमकी काय :
भारतात मिवी चे नवीन ड्युओपॉड्स एफ 40 ‘लाँच डे’ ऑफर अंतर्गत 999 रुपयांच्या किमतीत लाँच केले गेले आहेत.या ऑफरनंतर इअरबड्स हवे असल्यास १,१९९ रुपयात मिळू शकतील. तुम्ही हे डिव्हाईस फ्लिपकार्ट आणि मिवीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. व्हाइट, ब्लॅक, ग्रे, ग्रीन आणि ब्लू अश्या पाच वेगवेगळ्या कलरमध्ये मिवी ड्युओपॉड्स एफ ४० इयरबड्स खरेदीसाठी सज्ज आहेत.

एमआयव्हीआय ड्युओपॉड्स एफ 40 स्पेसिफिकेशन्स:
१. स्टुडिओ साऊंड अनुभवासाठी मिवी ड्युओपॉड्स एफ ४० मध्ये १३ मिमी इलेक्ट्रो-डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत.
२. हे इयरबड्स वजनाने हलके असतात. तसेच, यात वापर करणाऱ्याच्या आरामासाठी एर्गोनॉमिक डिझाइन आहे. यात कॉल क्वालिटी चांगल्यासाठी ड्युअल मायक्रोफोन वापरण्यात आला आहे.
३. यात सिरी आणि गुगल असिस्टंटसुद्धा आहे शिवाय ऑडिओ ट्रॅक बदलणे, कॉल स्वीकारणे आणि कॉल रिजेक्ट करण्यासाठी वन-टॅप टच बटणे समाविष्ट केली आहेत.
४.हे डिव्हाईस एकाच चार्जवर 50 तासांपर्यंत चालतो, असा कंपनीचा दावा आहे. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ व्हर्जन ५.१ देण्यात आले आहे.
५. या केसमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि बॅटरी वापराचा मागोवा घेण्यासाठी एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
६. इयरबड्स आयपीएक्स 4 वॉटर रेझिस्टंट रेटिंगसह येतात, म्हणून तुम्ही त्यांना अगदी पाऊस असताना किंवा व्यायाम करताना घालू शकतात. याव्यतिरिक्त, हे एक वर्षाच्या मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटीसह येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Mivi DuoPods F40 Earbuds with best online offer on Flipkart check details 9 June 2022.

हॅशटॅग्स

# Mivi DuoPods F40 Earbuds(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x