18 April 2025 9:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

OnePlus Ace 2V 5G | वनप्लस Ace 2V 5G स्मार्टफोन लाँच, 16 जीबी रॅम, 64 MP ट्रिपल कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा

OnePlus Ace 2V 5G

OnePlus Ace 2V 5G | प्रीमियम टेक कंपनी वनप्लसने एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे, जो कमी किंमतीत दमदार फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. वनप्लसने सर्वप्रथम नवीन वनप्लस एस २ व्ही आपल्या मायदेशी चीनमध्ये आणला आहे आणि लवकरच भारतातही उपलब्ध होणार आहे असं वृत्त आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार प्रोसेसरसह १६ जीबी रॅम आणि ६४ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आहे.

वनप्लस बऱ्याच काळापासून या स्मार्टफोनला टीज करत असून त्याचे की-स्पेसिफिकेशन्स आणि कलर व्हेरियंट आधीच समोर आले होते. या डिव्हाइसची वैशिष्ट्ये बऱ्याच प्रमाणात वनप्लस एस 2 सारखीच आहेत. यात मीडियाटेक डायमेंसिटी ९० प्रोसेसरसह १६ जीबी एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि यूएफएस ३.१ इंटरनल स्टोरेज आहे. या फोनमध्ये ५१२ जीबी स्टोरेज आहे.

स्पेसिफिकेशन्स
वनप्लसच्या नव्या डिव्हाइसमध्ये अँड्रॉइड १३ वर आधारित सॉफ्टवेअर आणि ६.७२ इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झ हाय रिफ्रेश-रेटवर सपोर्ट करण्यात आला आहे. फोनच्या रियर पॅनेलमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर, ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा तिसरा मॅक्रो सेन्सर आहे.

फोनमध्ये देण्यात आलेल्या ५००० एमएएच क्षमतेच्या बॅटरीला ८० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरव्यतिरिक्त ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. 5जी डिव्हाइसमध्ये वायफाय 6 व्यतिरिक्त ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट देण्यात आला आहे. मेटल फ्रेम आणि कंपनीच्या पॉप्युलर अलर्ट स्लाइडरसह हे डिव्हाइस लाँच करण्यात आले आहे.

किंमत
चीनमध्ये लाँच झालेल्या वनप्लस एस २ व्हीची किंमत १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजअसलेल्या बेस व्हेरियंटची किंमत २७,१४८ रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांनी 16 जीबी + 256 जीबी आणि 16 जीबी + 512 जीबी व्हेरिएंट अनुक्रमे 29,509 रुपये आणि 33,052 रुपये वर ठेवला आहे. हे डिव्हाइस ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: OnePlus Ace 2V 5G smartphone price in India check details on 07 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#OnePlus Ace 2V 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या