13 January 2025 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

OnePlus Nord N20 SE | वनप्लस नॉर्ड N20 SE लॉन्च होण्यापूर्वी भारतात विक्रीसाठी उपलब्ध, किंमत-फीचर्स पहा

OnePlus Nord N20 SE

OnePlus Nord N20 SE | वनप्लसचा नॉर्ड एन २० एसई बड्ट स्मार्टफोन भारतात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, कंपनीने अद्याप हा स्मार्टफोन अधिकृतपणे भारतात लाँच केलेला नाही, असे असूनही हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. लिस्टिंगनुसार, फोनमध्ये मोठा डिस्प्ले, स्ट्राँग कॅमेरा आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहे. लिस्टिंग पेजनुसार फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलमध्ये दिला जाईल.

लिस्टिंग पेजनुसार, या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाची स्क्रीन असून यात 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनवर अनेक बँक ऑफर्स आहेत, ज्यात फेडरल बँक क्रेडिट/ डेबिट कार्डवर 1500 रुपयांपर्यंत सूट आणि पंजाब नॅशनल बँक क्रेडिट कार्डवर 1250 रुपयांपर्यंत सूट आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँड कार्डवर 5% कॅशबॅकचा समावेश आहे. याशिवाय डेबिट कार्ड युजर्स 929 रुपये प्रति महिना ईएमआयवर फोन खरेदी करू शकतात.

वनप्लस नॉर्ड एन २० एसई मीडियाटेक हीलियो जी३५ प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. फोनच्या फ्रंट कॅमेरा हाऊसिंगमध्ये वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच मिळते.

कलर ऑप्शन
कंपनीने हा फोन ब्लू ओएसिस आणि सेलेस्टियल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. ऑक्सिजन ओएस १२ अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ऑनबोर्ड स्टोरेज वाढविण्यासाठी डिव्हाइसमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे.

फ्लिपकार्ट लिस्टिंग
फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, डिव्हाइसमध्ये ५,० एमएएच बॅटरी असून ३३ वॉट सुपरवूक चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, हा चार्जर फोनची बॅटरी 0 ते 50% पर्यंत फक्त 34 मिनिटात चार्ज करतो. याशिवाय डिव्हाइसवर सुपर पॉवर सेव्हिंग मोड आहे, जो केवळ 5% बॅटरीवर 90 मिनिटांपर्यंत टॉक टाइम किंवा 53 मिनिटांपर्यंत टेक्स्टिंग प्रदान करू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: OnePlus Nord N20 SE smartphone price on Flipkart and Amazon India check details on 24 November 2022.

हॅशटॅग्स

#OnePlus Nord N20 SE(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x