17 November 2024 6:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Oppo A17 Smartphone | ओप्पो A17 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमतही स्वस्त आणि अनेक फीचर्स मिळतील

Oppo A17 Smartphone

Oppo A17 Smartphone | ओप्पोने आपला नवा बजेट रेंज स्मार्टफोन ओप्पो A17 मंगळवारी भारतात लाँच केला आहे. ओप्पोचा लेटेस्ट ए-सीरिज स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि सनलाइट ऑरेंज अशा दोन रंगात उपलब्ध आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे. या स्मार्टफोनवर १५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर आहे. मात्र, ही ऑफर ग्राहकांना निवडक कार्डवरून खरेदीवर उपलब्ध आहे. ओप्पो ए१७ स्मार्टफोनची किंमत १२,४९९ रुपये आहे.

कुठे आणि कशी मिळणार सूट :
ओप्पोचा हा लेटेस्ट स्मार्टफोन ओप्पो स्टोअर आणि इतर रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येणार आहे. ओप्पो ए १७ स्मार्टफोन लाँच करताना कंपनीने ग्राहकांना १५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत निवडक कार्डांसह पेमेंटवर उपलब्ध असेल. खरेदी करताना ग्राहकांना अॅक्सिस बँक, कोटक बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर करून सवलतीचा लाभ मिळू शकतो.

स्मार्टफोनमधील हे आहे फीचर :
स्मार्टफोनचा डिस्प्ले साइज ६.५६ इंच आहे. एचडी + एलसीडी डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. फोनमध्ये 89.8 टक्के बॉडी-टू-स्क्रीन रेशियो आहे. डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी २६९ प्रति इंच आहे. याचा जास्तीत जास्त टच सॅम्पलिंग दर ६० हर्ट्ज आहे. डिस्प्लेच्या डिझाइनमध्ये वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे फ्रंट कॅमेऱ्याचा लूक खूपच आकर्षक होतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी ओप्पो ए 17 स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी 35 चिपसेट प्रोसेसर आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्मार्टफोनची स्टोरेज क्षमता वाढवून 1 टीबी करता येते.

फोटोग्राफीच्या बाबतीत, स्मार्टफोनमध्ये एआय सपोर्टसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. ओप्पो ए १७ मध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ओप्पो ए १७ स्मार्टफोन अँड्रॉइड १२ वर आधारित कलर ओएस १२.१.१ च्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय ५, जीपीएस आणि ए-जीपीएस, ब्लूटूथ व्ही ५.३, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी-सी आहे. फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, लाइट सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर प्रॉक्सिमिटी सेन्सर ग्रॅव्हिटी सेन्सरचा सपोर्ट दिला आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचरही देण्यात आले आहे. हे दोन फिचर्स सेट करून युजर्स आपला स्मार्टफोन सहज अनलॉक करू शकणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Oppo A17 Smartphone launched check price on India 05 October 2022.

हॅशटॅग्स

#Oppo A17 Smartphone(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x