12 January 2025 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील SBI Bank Scheme | SBI बँकेच्या नव्या योजनेचा फायदा घ्या; केवळ 80 रुपयांच्या गुंतवणुकीतून बनाल लाखांचे मालक SIP Mutual Fund | 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांची SIP किती कोटी रुपये परतावा मिळेल, जाणून घ्या रक्कम
x

Oppo A97 5G | ओप्पो A97 5G स्मार्टफोन लाँच | ड्युअल रियर कॅमेरा आणि 50 एमएएच बॅटरी

Oppo A97 5G

Oppo A97 5G | ओप्पो ए९७ ५ जी आता अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. ओप्पोने चीनमध्ये ओप्पो ए ९७ ५ जी लाँच करून आपल्या ए-सीरिजमध्ये स्मार्टफोन जोडला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येतो आणि यात ५००० एमएएच बॅटरी आहे.

दोन कलर ऑप्शन :
कंपनीने हा फोन केवळ १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. फोनची रॅम देखील १९ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. ओप्पो ए९७ ५ जी ची किंमत २३,६०० रुपये आहे. डीप सी ब्लू आणि कॉफी नाइट ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शनमध्ये हा स्मार्टफोन देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये 15 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन्स :
ओप्पो ए९७ ५ जी मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८१० चिपसेट आहे. फोनच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅशसोबत 48 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठीच्या नव्या फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.66 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये एआय-पॉवर्ड स्मार्ट आय प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

5000 mAh बॅटरी :
मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्शन 810 चिपसेट आहे, ज्यात 12 जीबी रॅम आहे. ओप्पो ए ९७ ५ जी मध्ये १९ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ओप्पो ए ९७ ५ जी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज आहे आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५० एमएएचची बॅटरी आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स आणि डिरॅक तंत्रज्ञान आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Oppo A97 5G smartphone launched check price in India here 12 July 2022.

हॅशटॅग्स

#Oppo A97 5G Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x