21 February 2025 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

OPPO Reno 13 5G | ओप्पो स्मार्टफोनची नवीन सिरीज लाँच होतेय, ओप्पो Reno 13 5G फीचर्स, स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

OPPO Reno 13 5G

OPPO Reno 13 5G | OPPO Reno 13 कंपनीने अलीकडेच केलेल्या घोषणेनुसार लवकरात लवकर भारतात ओपोची ही नवीन सिरीज लॉन्च करण्यात येणार आहे. लॉन्चिंगदरम्यान ओप्पो कंपनी केवळ एकच नाही तर, 2 स्मार्टफोन चाहत्यांना देणार आहे. यामध्ये ‘OPPO Reno 13’ आणि ‘Reno 13 Pro’ हेच मार्क फोन शामिल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ओप्पो कंपनी 2025 च्या जानेवारी महिन्यातच आपली नवीन सिरीज सादर करणार आहे. चला तर जाणून घेऊया OPPO Reno 13 या स्मार्टफोनविषयी संपूर्ण माहिती.

ओप्पोची नवीन सिरीज 9 जानेवारी 2025 रोजी भारतामध्ये दमदार एन्ट्रीसह लॉन्च होणार आहे. ओप्पाच्या या दोन्ही स्मार्टफोनची झलक कंपनीच्या वेबसाईटवर लाईव्ह करण्यात आली आहे. भारतात लॉन्च करण्याआधीच ओप्पोने चीन देशात आपला स्मार्टफोन लॉन्च करून जबरदस्त प्रतिसाद मिळवला आहे. चला तर जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि कॅमेरा कॉलिटी बद्दल माहिती.

डिस्प्ले :
OPPO Reno 13 या नवीन स्मार्टफोनमध्ये 1.5k आणि 6.83 इंच लांबीचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याची क्वालिटी अत्यंत जबरदस्त आहे. दरम्यान या स्मार्टफोनमध्ये इनडिस्प्ले, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स देखील दिले आहेत. हा डिस्प्ले 1.5k चा असून अल्ट्रा हायडेफिनेशन डिस्प्ले आहे. जो 120Hz सोबत आलेला पाहायला मिळतो.

कॅमेरा कॉलिटी :
OPPO Reno 13 या नव्या स्मार्टफोनला मागील बाजूस म्हणजेच पॅनलवर एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8MP अल्ट्राव्हाइड अँगल लेन्स आणि 50MP IMX 890 पर्यंत मुख्य सेन्सर दिला आहे. ज्या व्यक्ती फोटोग्राफर प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन अत्यंत जबरदस्त ठरणार आहे. कारण की यामध्ये एलईडी फ्लॅश त्याचबरोबर 50MP पर्यंत Sony OIS मुख्य सेल्सर दिला आहे. यामध्ये तुम्हाला 50MP चा सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा देखील मिळणार आहे.

बॅटरीविषयी जाणून घ्या :
ओपोच्या नव्या सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये 5,800mAh पर्यंत बॅटरी देण्यात आली आहे. जी दीर्घकाळ चालते. त्याचबरोबर ही बॅटरी 80W वायर असलेल्या फास्ट चार्जिंगसह उपलब्ध होते. त्याचबरोबर दुसऱ्या लॉन्चिंग स्मार्टफोनमध्ये देखील 5,600mAh पर्यंत बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सुद्धा 80W च्या फास्ट चार्जिंगसह येते.

प्रोसेसर :
OPPO Reno 13 pro या स्मार्टफोनमध्ये 8350 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर OPPO Reno 13 या स्मार्टफोन मध्ये देखील ऑक्टा-कोर 8350 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Latest Marathi News | OPPO Reno 13 5G Monday 06 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#OPPO Reno 13 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x