महत्वाच्या बातम्या
-
Lenovo Tab6 5G Launched | लेनोवो टॅबलेट-6 5G लॉन्च | काय आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत
लेनोवोने जपानमध्ये आपला लेनोवो टॅब 6 5G टॅबलेट लॉन्च केला आहे. यामध्ये डिव्हाइस 10.3-इंच डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 690 एसओसी देण्यात आला आहे. लेनोवोने सांगितल्याप्रमाणे, हा टॅबलेट जपानमध्ये कंपनीने लाँच केलेला पहिला 5G- अँड्रॉइड टॅबलेट आहे. पाणी आणि धूळ पासून बचावासाठी टॅब्लेट IPX3 आणि IP5X गॅरेंटी देण्यात (Lenovo Tab6 5G Launched) आली आहे. सध्या कंपनीने लेनोवो टॅब6 5G ची किंमत जाहीर केलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy W22 5G Foldable Smartphone | सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी W22 5G
स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने आपला आधुनिक फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी W22 5G चीनमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक-गोल्ड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये अमोलेड स्क्रीन (Samsung Galaxy W22 5G Foldable Smartphone) देण्यात आली आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर उपलब्ध असेल.
3 वर्षांपूर्वी -
Realme GT Neo 2T Launch Date | Realme GT Neo 2T भन्नाट कॅमेऱ्यासह मिड बजेट स्मार्टफोन
रियलमीने काही दिवसांपूर्वी आपल्या पॉवरफू जीटी सीरिजमध्ये Realme GT Neo 2 स्मार्टफोन सादर केला आहे. चीनमध्ये सादर झालेला हा फोन या आठवड्यात भारतीय बाजारात देखील दाखल (Realme GT Neo 2T Launch Date) होणार आहे. त्याचबरोबर आता अजून एका नवीन Realme फोनची माहिती समोर आली आहे. कंपनी आपल्या ‘नियो जीटी 2’ लाईनअपमध्ये Realme GT Neo 2T नावाचा नवीन फोन जोडणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
OnePlus 9RT Launch on October 13 | बहुचर्चित OnePlus 9RT स्मार्टफोनची वैशिष्ठे काय आहेत?
प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी वनप्लस लवकरच आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारी करत आहे. कंपनीचे हे आगामी डिव्हाइस OnePlus 9RT आहे, जे 13 ऑक्टोबर रोजी (OnePlus 9RT Launch on October 13) लॉन्च केले जाईल. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच त्याच्याशी संबंधित अनेक लीक रिपोर्ट्सही समोर आले आहेत. ज्यामध्ये त्याची काही वैशिष्ट्ये समोर आली आहेत. यापूर्वी या स्मार्टफोनची काही छायाचित्रे देखील लीक झाली होती, ज्यात या फोनची रचना दिसली होती.
3 वर्षांपूर्वी -
Apple Watch Series 7 | प्री-बुकिंगला सुरुवात | ही आहे खासियत आणि किंमत
अॅपल वॉच सिरीज 7 (Apple Watch Series 7) च्या प्री बुकिंगला सुरुवात झाली. मागील महिन्यात हे स्मार्टवॉच आयफोन 13 सिरीज, आयपॅड मिनी आणि न्यू आयपॅड सह लॉन्च करण्यात आले. आज संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून याच्या प्री-बुकिंगला सुरुवात होणार आहे. अॅपल इंडिया, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईटवरुन प्री-बुकिंग करता येईल. दरम्यान, हे स्मार्टवॉच 15 ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल, अशी माहिती अॅपल इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Nokia T20 Tablet | Nokia T20 Tablet लाँच | काय आहेत फीचर्स
प्रसिद्ध टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने नुकताच नोकियाचा एक उत्तम डिव्हाइस लाँच (Nokia T20 Tablet) केले आहे. कंपनीचा हा लेटेस्ट टॅबलेट नोकिया टी 20 आहे. हा टॅबलेट उत्तम वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यामध्ये, वापरकर्त्यांना 2K डिस्प्ले मिळेल आणि 8-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेन्सर मिळेल. व्हर्च्युअल परस्परसंवादासाठी टॅब्लेट ड्युअल मायक्रोफोन आणि स्टीरिओ स्पीकर्ससह येतो. नोकिया टी 20 मध्ये दिवसभरातील बॅटरी दिवसभर चालेल. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर …
3 वर्षांपूर्वी -
Windows 11 | मायक्रोसॉफ्ट Windows 11ची घोषणा | हे आहेत टॉप फीचर्स
Microsoft ने भारतीय युजर्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टिम Windows 11 रोलआउट करायला सुरुवात केली असून Windows 10 युजर्सना प्रथम या नवीन ऑपरेटिंग सिस्टमचे अपडेट मिळेल. यासह, नवीन लाँच केलेल्या लॅपटॉपमध्ये WIndows 11 ला सपोर्ट असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, कंपनीने Windows 11 डिव्हाइसेस पूर्व-स्थापित करण्यासाठी Asus, HP, Lenovo, Acer आणि Dell सोबत भागीदारी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
POCO C31 Smartphone | POCO C31 स्मार्टफोनची खास बात
प्रसिद्ध स्मार्टफोन बनवणारी कंपनी POCO’ने आपला नवीन स्मार्टफोन अनेक सुविधांनी सज्ज केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन POCO C31 स्मार्टफोन (POCO C31 Smartphone) आहे. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. POCO च्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रसिद्ध ‘केलेल्या पोस्टद्वारे ही माहिती प्राप्त झाली होती. हा फोन खूप विविध वैशिष्ठांनी संपन्न असेल असा दावा कंपनीने केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दल सविस्तर
3 वर्षांपूर्वी -
Microsoft Foldable Smartphone Surface Duo 2 | सुपर प्रोसेसरसह मायक्रोसॉफ्टचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च | गेमिंगसाठी उत्तम
टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने आपला लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन मायक्रोसॉफ्ट सरफेस डुओ 2 आहे. हा स्मार्टफोन खास वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यामध्ये, वापरकर्त्यांना क्वालकॉमचा प्रोसेसर देखील मिळेल, ज्याच्या मदतीने स्मार्टफोन खूप सुपर पद्धतीने चालेल. यासोबतच दोन एचडी स्क्रीन आणि तीन कॅमेरेही फोनमध्ये असतील. तर चला मायक्रोसॉफ्ट सरफेस डुओ 2 च्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Microsoft Chatbot Talk To Dead People | मृत्यू झालेल्या व्यक्तीसोबत बोलल्याचा भास करून देणारे मायक्रोसॉफ्टचे चॅटबॉट
विज्ञान रोज नवनवीन कमाल करून दाखवित असते. आता हेच पहा ना, जे आता जगात नाहीत त्यांच्यासोबत बोलल्याचा भास करून देणारे चॅटबॉट मायक्रोसॉफ्टने तयार केले आहे. गेल्या महिन्यातच कंपनीने त्याचे पेटंट घेतले आहे. ही कल्पना अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही मालिका ब्लॅक मिररमधून सुचली आहे. यात मुख्य भूमिकेतील मुलगी तिच्या मृत प्रियकरासोबत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमधून घेतलेल्या माहितीच्या आधारे बोलत असते.
3 वर्षांपूर्वी -
iPhone 13 Launch | १ हजार GB पर्यंत स्टोअरेज, सिनेमॅटिक मोड | किमतींतही बदल नाही
जगातील नंबर-१ टेक्नाॅलॉजी कंपनी ॲपलने आपला वार्षिक इव्हेंट ‘कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग’मध्ये मंगळवारी रात्री एकूण ७ उत्पादने लाँच केली. यात २ आयपॅड, ॲपल वॉच सिरीज-७ आणि ४ आयफोनचा समावेश आहे. सुमारे दीड तास चाललेल्या कार्यक्रमात कंपनीने दावा केला की, आयफोन-१३ सिरीज आजवरच्या आयफोनमध्ये सर्वाधिक वेगवान असेल. आयफोन-१३ ची मॉडेल्स १२८ जीबी, २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १,००० जीबी (१ टीबी) स्टोअरेजसोबत येतील.
3 वर्षांपूर्वी -
Beeper App लॉन्च | WhatsApp, Telegram, Signal, iMessage एकत्रित हाताळा
सर्व मेसेजिंग अॅपला एकत्र आणणारे नवे अॅप Beeper लॉन्च झाले आहे. Pebble स्मार्टवॉच कंपनीचे फाऊंडर Eric Migicovsky यांनी हा अॅप डेव्हलअप केला आहे. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, मेसेंजर, स्काईप, Discord, IRC. Slack, SMS, Twitter DMs, Apple iMessage आणि Google Hangouts यांसारख्या 15 मोठ्या मेसेजिंग अॅपचे सेंटर पाईंट म्हणून बीपर काम करु शकतो. या अॅपमधूनच तुम्ही कोणत्याही अॅप मेसेजला रिप्लाय करु शकता. हा अॅप वापरण्यासाठी तुम्हाला महिन्याला 10 डॉलर म्हणजे 730 रुपये मोजावे लागतील. या अॅपची अजून एक खासियत म्हणजे तुम्ही अॅनरॉईड मोबाईलवर सुद्धा iMessager चालवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Whatsapp Updates | नवी पॉलिसी | सहमत नसाल तर व्हॉट्स बंद होणार
फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्सअॅप नवीन वर्षात कात टाकतंय. येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे. व्हॉट्स अॅपच्या नव्या अटी आणि धोरणांशी सहमत नसाल तर तुमचं व्हॉट्स बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपचं नवं अटी आणि गोपनियता धोरण 8 फ्रेब्रुवारी 2021 पासून अंमलात येईल.
4 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy A31 Smartphone | झाला स्वस्त | जाणून घ्या किंमत
Samsung Galaxy A31: सॅमसंगचा ए-सीरिजचा उत्तम स्मार्टफोन गॅलेक्सी ए 31 (Galaxy A31) आता स्वस्त झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 2 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये Galaxy A31 ची किंमत कमी केली गेली होती. यावर्षी जूनमध्ये हा स्मार्टफोन 21,999 रुपये किंमतीसह लाँच करण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
WhatsApp Updates | लवकरच multi-device support हे नवे फिचर येणार
व्हॉट्सॲप हे लोकप्रिय ॲप नवनवे फिचर्स सादर करुन आपल्या युजर्संना खुश करत असतं. आता व्हॉट्सॲप एका नव्या फिचरचे टेस्टिंग करत आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट असे या फिचरचे नाव असून यामुळे व्हॉट्सॲप मल्टीपल डिव्हाईसेस वर चालवणे शक्य होणार आहे. दरम्यान, या फिचरची सर्वजण खूप काळापासून वाट पाहत होते. व्हॉट्सॲपचे नवे फिचर ट्रॅक करणाऱ्या WABetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप या फिचरचे टेस्टिंग करत असून व्हॉट्सॲप मल्टिपल डिव्हाईसेसवर सेटअप असल्यावर सुद्धा कॉल रिसिव्ह होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Police Alert | घरबसल्या मोबाईलवरून दिवसाला हजारो कमवा मेसेज | जर त्या लिंकवर..
सध्या तंत्रज्ञान आणि फसवणूक हे एक समीकरण होऊ लागलं आहे. आज प्रत्येक हातात मोबाईल असतो आणि त्यावर समाज माध्यमांशी संबंधित अँप इंस्टाल असतात. त्यात रियलटाइम चॅटिंग अँप व्हाट्सअँप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे फसवणूक करण्याचा तो सोपा मार्ग झाला आहे. त्यात बेरोजगारी वाढू लागल्याने सामान्यांना देखील अधिक मार्गाने पैसे कमविण्याचे मार्ग शोधावे लागतात. नेमका त्याचाच फायदा घेऊन काही हॅकर्स लिंक तयार करून व्हाट्सअँप वर एका मेसेजच्या मार्फत पाठवून अनेकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gadget World | Oppo Reno 5 5G & Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोन्स लॉन्च
गॅझेट्स मार्केटमध्ये सध्या 5 G फोन्सची धूम आहेत. यात ओप्पो चा सर्वात पहिले 5G फोन्स लॉन्च केले आहेत. Oppo च्या Reno सिरीजमधील दोन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. ओप्पो रेनो 5 प्रो 5जी (Oppo Reno 5 5G) आणि ओप्पो रेनो 5 प्रो 5जी (Oppo Reno 5 Pro 5G). या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमरा सेटअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच याची किंमत नेमकी किती आहे. जाणून घेऊया दोन्ही स्मार्टफोन्सच्या फिचर्स आणि किंमतीबद्दल..
4 वर्षांपूर्वी -
India Mobile Congress 2020 | मुकेश अंबानी यांची 5G सेवांबाबत मोठी घोषणा
संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच दिली होती. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर भाष्य केलं होते. त्यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
WhatsApp Alert | डिलीट केलेले मेसेज सुद्धा वाचता येतात | ही ट्रिक वापरतात
WhatsApp युजर्सची चॅटिंग आणखी मजेदार करण्यासाठी कंपनी एकापेक्षा एक फीचर देते. २०० कोटी हून अधिक युजर्स असलेले WhatsApp हे जगातील नंबर वन मेसेजिंग अॅप आहे. गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅपमध्ये अनेक अपडेट आणि फीचर मिळाले आहेत. यातील एक म्हणजे डिलीट झालेले मेसेज एक आहे. या फीचरला कंपनीने २०१७ ला लाँच केले होते. युजरने चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करू शकतो. डिलीट झालेले मेसेज ग्रुप किंवा पर्सनल चॅटवरून गायब होतात. डिलीट झालेले मेसेज कोणी पाहू शकत नाही. परंतु, यात एक खास ट्रिक आहे. ज्यामुळे डिलीट झालेले मेसेज वाचता येऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Netflix Updates | भारतात ‘इतक्या’ दिवसांसाठी मोफत कन्टेंट पाहता येणार
सध्या अनेक जण टीव्ही, थिएटर्सपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्म्सना अधिक पसंती देताना दिसत आहेत. यासाठीच काही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स घेऊन येत आहेत. सध्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनंही एक मोठी घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सनं भारतात दोन दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. Netflix StreamFest अंतर्गत युझर्सनाही ही मोफत सेवा देण्यात येणार आहे. नेटफ्लिक्च्या या फेस्टदरम्यान युझर्सना कोणत्याही प्रकारचे प्रिमिअम कंटेट पाहता येणार आहे. तसंच यासाठी त्यांना पैसैही मोजावे लागणार नाहीत. परंतु यासाठी युझर्सना ईमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांकाद्वारे साईन इन करावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS