महत्वाच्या बातम्या
-
Beeper App लॉन्च | WhatsApp, Telegram, Signal, iMessage एकत्रित हाताळा
सर्व मेसेजिंग अॅपला एकत्र आणणारे नवे अॅप Beeper लॉन्च झाले आहे. Pebble स्मार्टवॉच कंपनीचे फाऊंडर Eric Migicovsky यांनी हा अॅप डेव्हलअप केला आहे. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, मेसेंजर, स्काईप, Discord, IRC. Slack, SMS, Twitter DMs, Apple iMessage आणि Google Hangouts यांसारख्या 15 मोठ्या मेसेजिंग अॅपचे सेंटर पाईंट म्हणून बीपर काम करु शकतो. या अॅपमधूनच तुम्ही कोणत्याही अॅप मेसेजला रिप्लाय करु शकता. हा अॅप वापरण्यासाठी तुम्हाला महिन्याला 10 डॉलर म्हणजे 730 रुपये मोजावे लागतील. या अॅपची अजून एक खासियत म्हणजे तुम्ही अॅनरॉईड मोबाईलवर सुद्धा iMessager चालवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Whatsapp Updates | नवी पॉलिसी | सहमत नसाल तर व्हॉट्स बंद होणार
फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्सअॅप नवीन वर्षात कात टाकतंय. येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे. व्हॉट्स अॅपच्या नव्या अटी आणि धोरणांशी सहमत नसाल तर तुमचं व्हॉट्स बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपचं नवं अटी आणि गोपनियता धोरण 8 फ्रेब्रुवारी 2021 पासून अंमलात येईल.
4 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy A31 Smartphone | झाला स्वस्त | जाणून घ्या किंमत
Samsung Galaxy A31: सॅमसंगचा ए-सीरिजचा उत्तम स्मार्टफोन गॅलेक्सी ए 31 (Galaxy A31) आता स्वस्त झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 2 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये Galaxy A31 ची किंमत कमी केली गेली होती. यावर्षी जूनमध्ये हा स्मार्टफोन 21,999 रुपये किंमतीसह लाँच करण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
WhatsApp Updates | लवकरच multi-device support हे नवे फिचर येणार
व्हॉट्सॲप हे लोकप्रिय ॲप नवनवे फिचर्स सादर करुन आपल्या युजर्संना खुश करत असतं. आता व्हॉट्सॲप एका नव्या फिचरचे टेस्टिंग करत आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट असे या फिचरचे नाव असून यामुळे व्हॉट्सॲप मल्टीपल डिव्हाईसेस वर चालवणे शक्य होणार आहे. दरम्यान, या फिचरची सर्वजण खूप काळापासून वाट पाहत होते. व्हॉट्सॲपचे नवे फिचर ट्रॅक करणाऱ्या WABetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप या फिचरचे टेस्टिंग करत असून व्हॉट्सॲप मल्टिपल डिव्हाईसेसवर सेटअप असल्यावर सुद्धा कॉल रिसिव्ह होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Police Alert | घरबसल्या मोबाईलवरून दिवसाला हजारो कमवा मेसेज | जर त्या लिंकवर..
सध्या तंत्रज्ञान आणि फसवणूक हे एक समीकरण होऊ लागलं आहे. आज प्रत्येक हातात मोबाईल असतो आणि त्यावर समाज माध्यमांशी संबंधित अँप इंस्टाल असतात. त्यात रियलटाइम चॅटिंग अँप व्हाट्सअँप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे फसवणूक करण्याचा तो सोपा मार्ग झाला आहे. त्यात बेरोजगारी वाढू लागल्याने सामान्यांना देखील अधिक मार्गाने पैसे कमविण्याचे मार्ग शोधावे लागतात. नेमका त्याचाच फायदा घेऊन काही हॅकर्स लिंक तयार करून व्हाट्सअँप वर एका मेसेजच्या मार्फत पाठवून अनेकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gadget World | Oppo Reno 5 5G & Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोन्स लॉन्च
गॅझेट्स मार्केटमध्ये सध्या 5 G फोन्सची धूम आहेत. यात ओप्पो चा सर्वात पहिले 5G फोन्स लॉन्च केले आहेत. Oppo च्या Reno सिरीजमधील दोन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. ओप्पो रेनो 5 प्रो 5जी (Oppo Reno 5 5G) आणि ओप्पो रेनो 5 प्रो 5जी (Oppo Reno 5 Pro 5G). या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमरा सेटअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच याची किंमत नेमकी किती आहे. जाणून घेऊया दोन्ही स्मार्टफोन्सच्या फिचर्स आणि किंमतीबद्दल..
4 वर्षांपूर्वी -
India Mobile Congress 2020 | मुकेश अंबानी यांची 5G सेवांबाबत मोठी घोषणा
संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच दिली होती. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर भाष्य केलं होते. त्यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
WhatsApp Alert | डिलीट केलेले मेसेज सुद्धा वाचता येतात | ही ट्रिक वापरतात
WhatsApp युजर्सची चॅटिंग आणखी मजेदार करण्यासाठी कंपनी एकापेक्षा एक फीचर देते. २०० कोटी हून अधिक युजर्स असलेले WhatsApp हे जगातील नंबर वन मेसेजिंग अॅप आहे. गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅपमध्ये अनेक अपडेट आणि फीचर मिळाले आहेत. यातील एक म्हणजे डिलीट झालेले मेसेज एक आहे. या फीचरला कंपनीने २०१७ ला लाँच केले होते. युजरने चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करू शकतो. डिलीट झालेले मेसेज ग्रुप किंवा पर्सनल चॅटवरून गायब होतात. डिलीट झालेले मेसेज कोणी पाहू शकत नाही. परंतु, यात एक खास ट्रिक आहे. ज्यामुळे डिलीट झालेले मेसेज वाचता येऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Netflix Updates | भारतात ‘इतक्या’ दिवसांसाठी मोफत कन्टेंट पाहता येणार
सध्या अनेक जण टीव्ही, थिएटर्सपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्म्सना अधिक पसंती देताना दिसत आहेत. यासाठीच काही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स घेऊन येत आहेत. सध्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनंही एक मोठी घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सनं भारतात दोन दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. Netflix StreamFest अंतर्गत युझर्सनाही ही मोफत सेवा देण्यात येणार आहे. नेटफ्लिक्च्या या फेस्टदरम्यान युझर्सना कोणत्याही प्रकारचे प्रिमिअम कंटेट पाहता येणार आहे. तसंच यासाठी त्यांना पैसैही मोजावे लागणार नाहीत. परंतु यासाठी युझर्सना ईमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांकाद्वारे साईन इन करावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Whatsapp updates | व्हिडिओ पाठवताना आणि स्टेट्स ठेवताना होणार हे बदल
रियल टाईम मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप वर दिवसेंदिवस अनेक बदल होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना चांगला अनुभव यावा आणि त्यातून अधिक वापरकर्ते वाढावे असा व्हॉट्सअॅपचा व्यावसायिक हेतू आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक महत्व वापरकर्त्यांच्या सुरक्षेला देण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कसलं बॉयकॉट चायना | Xiaomi'ने ३ महिन्यात 1.35 कोटी स्मार्टफोन्स विकले
देशातील सामान्य लोकांचं आणि तरुणाईचं मोबाईल वेड खूप मोठं असून त्यासाठी भारतीय खूप पैसा खर्च करत असतात. काही महिन्यांपूर्वी पारंपरिक शत्रू राष्ट्र असलेल्या चीन सोबत भारताचे संबंध अत्यंत टोकाला जाऊन युद्धाच्या धमक्यांवर जाऊन पोहोचले होते. त्यानंतर भारतीयांनी देखील समाज माध्यमांवर बॉयकॉट चायनाचा नारा दिला होता. मात्र त्यानंतर दिसून आलेल्या देशभक्ती चायनीस मोबाईल प्रेमापुढे कुचकामी ठरली आहे. कारण भारतात चिनी कंपन्या मागील काही दिवसांपासून त्यांच्या मोबाईलची रेकॉर्डब्रेक विक्री करत आहेत. चिनी मोबाईल कंपनी शाओमी इंडियाने (Xiaomi India) मागील ३ महिन्यांत देशभरातील मोठं मार्केट काबीज केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात Whatsapp Pay फीचर आले | चॅटिंग प्लस ऑनलाइन पेमेंट
भारतात प्रसिद्ध असलेल्या रियलटाइम मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग केली जात होती. दरम्यान, २०१८ मध्ये BETA युजर्ससोबत सुरू झालेली ही टेस्टिंग आता पूर्ण झाली असून अखेर हे फीचर भारतातील सामान्य युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता सामान्य वापरकर्त्यांना देखील थेट व्हाट्सअँपच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करणं शक्य होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
बापरे | आरोग्य सेतू अॅप कुणी बनवलं ते मोदी सरकारला माहित नाही | डेटा कोणाकडे?
कोरोनाचा प्रसार वेगाने सुरु झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रवासासह अनेक ठिकाणी हे अॅप सक्तीचं करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्याने त्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने जाहिरात करून मोठा खर्च देखील केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
WhatsApp Updates | फेक नोटिफिकेशन्स डोक्यात जातात | आलं नवं फीचर
WhatsApp वर एक नवीन अपडेट आले आहे. नवीन अपडेट सोबत एक नवीन फीचर सुद्धा आले आहे. अँड्रॉयड आणि आयओएस दोन्हीवर युजर्संना ग्रुप्स किंवा चॅटचे नोटिफिकेशन्स नेहमीसाठी म्यूट करण्याचे ऑप्शन मिळाले आहे. जवळपास प्रत्येक युजर्सच्या व्हाट्सअँपमध्ये अनेक ग्रुप्स असतात ज्याचे मेंबर असणे मजबुरी असते. फॅमिली ग्रुप्स पासून काही ऑफिशल ग्रुप्स पर्यंत असू शकतात. यातील मेसेज काही कामाचे नसतात. त्यामुळे हे नेहमीसाठी म्यूट करता येवू शकते.
5 वर्षांपूर्वी -
Jio 5G Smartphone २७ हजाराचा | रिलायन्स देणार अवघ्या २५०० रुपयात
भारतात मोबाइल फोन इंटरनेटची क्रांती घडवून आणणारी कंपनी रिलायन्स जिओने (Jio) 4G नंतर आता 5G मध्ये क्रांती आणण्याची तयारी सुरू केली आहे. लोकांना अगदी कमी किंमतीत म्हणजेच केवळ २५०० ते ३००० रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन जिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या भारतात 5G स्मार्टफोनची (5G smartphone) किंमत २७००० रुपयांपासून सुरू होते. रिलायन्स जिओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी 5G स्मार्टफोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात आणण्याची योजना आखत आहे आणि याच्या विक्रीत वाढ झाल्यास याच्या किंमतीत घट करुन तो २५०० ते ३००० रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिला जाईल. या उपक्रमांतर्गत कंपनी सध्या 2G कनेक्शन वापरत असणाऱ्या २० ते ३० कोटी यूजर्संना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
Gadget World | Samsung Galaxy S20 FE | भारतात आज लाँच होणार
Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन मागील महिन्यात Galaxy S20 फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या लाइट व्हर्जन व्हेरिएंटच्या रूपात लॉन्च झाला होता. गॅलेक्सी एस 20 एफई ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि होल-पंच डिस्प्लेसह येतो. या स्मार्टफोनची डिझाइन फ्लॅगशिप एस 20 आणि टीप 20-मालिकेशी जुळते. सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई मध्ये कंपनीने 120 हर्ट्ज डिस्प्ले वापरला आहे आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक कलर ऑप्शन्स सादर केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy F41 ते iPhone 12 पर्यंत | सुपर दमदार स्मार्टफोन
फेस्टिव सीजन लवकरच येणार आहे. मोबाइल मेकर कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहेत. सॅमसंगपासून अॅपल आणि वनप्लस यासारख्या दिग्गज कंपन्या लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. हे सर्व फोन तगड्या फीचर्स सोबत येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार
व्हॉट्सअॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअॅपचा देखील नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. लवकरच युजर्सना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर मिळणार आहे. यामुळे मेसेज एका टाईम लिमिटच्या आतमध्ये ऑटो डिलीट होतील. युजर्संना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग टेक्स्टसोबत सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शेयर करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
WhatsApp Time | तुमचं चॅटिंग कोणीच वाचू शकणार नाही | भन्नाट सेटिंग फीचर्स
व्हाट्सअँप आज प्रत्येक सामान्य माणूस ते श्रीमंतांपासून सर्वाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तुमच्या व्हाटसअँप’मध्ये अनेक ओळखीची लोकं, मित्रमंडळी, नातेवाईक ते घरातील माणसं असे सर्वच संपर्कात असतात. मात्र यातील सर्वांशीच तम्ही तुमच्या खाजगी गोष्टी शेअर करू इच्छिता असं नाही. त्यामुळे अनेकांना आपण काही गोष्टींपासून थोडं लांबच ठेवणं पसंत करतो. त्यासाठीच व्हाट्सअँप’मध्ये काही भन्नाट फीचर्स आहेत जे अनेकांना आजही माहित नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
PUBG सह इतर ११८ ऍप्सवर बंदी | भारत सरकारचा निर्णय
देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE