17 April 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Poco F4 5G | पोको F4 5G स्मार्टफोन सेल | 4000 रुपयांची सूट आणि फ्री हॉटस्टार, डिस्ने आणि यूट्यूब प्रीमियम

Poco F4 5G

Poco F4 5G | पोको एफ 4 5 जी गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आला होता आणि आज हा फोन पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हा फोन कंपनीच्या पोको एफ 1 चा उत्तराधिकारी आहे, जो प्रीमियम सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय मानला जातो. पोको एफ ४ 5जी तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

रॅम प्रमाणे किंमत :
याच्या ६ जीबी रॅमची किंमत 27,999 रुपये, ८ जीबी रॅमची किंमत 29,999 रुपये आणि याच्या हाय-एंड मॉडेलची किंमत 33,999 रुपये आहे. फोनचा सेल दुपारी 12 वाजता सुरु होणार असून खास गोष्ट म्हणजे ग्राहकांना यावर 4 हजार रुपयांची सूट मिळू शकते.

1000 रुपयांची सूट आणि बरंच काही मोफत :
याशिवाय पोको आज सेलच्या सर्व खरेदीदारांना 1000 रुपयांची सूट देत आहे, त्यानंतर याच्या बेस मॉडेलची किंमत 26,999 रुपये होईल. जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी एसबीआय कार्डचा वापर करत असाल तर तुम्हाला 3 हजार रुपयांची सूट दिली जाईल. ग्राहकांना दोन महिन्यांसाठी यूट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शन आणि एक वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार बेनिफिट देखील दिले जाईल.

फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले :
पोको एफ 4 5 जी मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेटसह सुसज्ज आहे, जो १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह ऑफर केला आहे.

६४ मेगापिक्सलचा कॅमेरा :
कॅमेरा म्हणून पोको एफ 4 5 जी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी 64-मेगापिक्सलचा शूटर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल शूटर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी पोको एफ 4 5 जीच्या फ्रंटमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

४५०० एमएएचची बॅटरी :
पॉवरसाठी पोको एफ ४ 5जी मध्ये ४५०० एमएएचची बॅटरी आहे, जी ६७ वॉट फास्ट चार्जिंगसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी पोको एफ ४ ५जी ५ जी ५जी, ४जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ व्ही ५.२, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Poco F4 5G sale special discount check price detail online here 27 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

# Poco F4 5G smartphone(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या