21 February 2025 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही

Poco X7 5G

Poco X7 5G | सर्वात लोकप्रिय आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या पोको कंपनीच्या नव्या आणि आगामी स्मार्टफोनची जोरदार चर्चा रंगली आहे. लवकरच पोको त्याची नवीन सिरीज Poco X7 हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. भारतात लॉन्च होण्याची तारीख समोर आली असून फ्लिपकार्टवर मायक्रोसाईट लाईव्ह सुरू झाली आहे.

Poco X7 ची लॉंच डेट जाणून घ्या :

पोकोच्या या नव्या सिरीजच्या स्मार्टफोनची भारतात होणारी लॉन्चिंग डेट समोर आली आहे. 2025 च्या नव्या वर्षात हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. 9 जानेवारी 2025 ही तारीख कंपनीकडून देण्यात आली आहे. इतर माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 9 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पोकोच्या नव्या स्मार्टफोन सिरीजची जोरदार लॉन्चिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 9 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट म्हणजेच flipkart वरती याची तुफान विक्री देखील पाहायला मिळणार आहे.

नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या :

1. पोकोचा हा नवा स्मार्टफोन प्रो मॉडेल आणि 6.67 इंच लांबीच्या नव्या डिस्प्लेसह येणार आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका देण्यात आला आहे.

2. स्मार्टफोनबद्दल असं देखील सांगण्यात आलो आहे की, या स्मार्टफोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्ट्स 2 एवढे प्रोटेक्शन मिळू शकते. चांगल्या परफॉर्मन्ससाठी कंपनीने पोकोच्या स्मार्टफोनमध्ये X7 फोन आणि 7300 अल्ट्रा प्रोसेसर सुसज्ज करण्यात आले आहे.

3. त्याचबरोबर अल्ट्रा प्रो मीडिया टेक डिमेन्सिटी 8400 प्रोसेसरनुसार सुसज्ज केली जाऊ शकते. कंपनीने कॅमेरा प्रेमींची देखील खास काळजी घेतली आहे. यामध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रीयर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

4. त्याचबरोबर 50MP चा प्रमुख कॅमेरा दिला गेला आहे. सोबतच 8MP अल्ट्रावाईड सेन्सर देखील दिला गेला आहे. जबरदस्त व्हिडिओ कॉलिंग सेटअप त्याचबरोबर सेल्फी काढण्यासाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

5. लवकरात लवकर हा फोन भारतामध्ये लॉन्च होणार असून, अनेकजण फोन विक्री करण्यास आतुर झाली आहेत. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन एवढे जबरदस्त आहेत की, कधी एकदा फोन खरेदी करतोय असं ग्राहकांना झालं आहे.

Latest Marathi News | Poco X7 5G Wednesday 01 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Poco X7 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x