17 November 2024 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Realme C33 Smartphone | रियलमी C33 बजेट स्मार्टफोन भारतात लाँच, स्वस्त किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Realme C33 Smartphone

Realme C33 Smartphone | रिअलमी कंपनीने मंगळवारी आणखी एक नवीनतम बजेट फोन रियलमी C33 भारतात लाँच केला आहे. या नव्या फोनचा डिस्प्ले 6.5 इंचाचा आहे. हा नवीन फोन ग्राहकांसाठी सँडी गोल्ड, अॅक्वा ब्लू आणि नाईट सी अशा तीन रंगात उपलब्ध आहे. फोनची किंमत 8,999 रुपयांपासून सुरू होते.

हा बजेट फोन १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ नंतर रियलमीची अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्म, तसेच इतर ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल. कंपनीने रियलमी सी ३३ फोनचे दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. तर दुसऱ्या व्हेरियंटमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. याची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

स्मार्टफोनमधील फीचर्स :
रियलमीने सांगितले की, नव्या रियलमी सी ३३ फोनच्या बॅक पॅनलचे डिझाइन मायक्रो लेव्हल प्रोसेसिंग आणि लिथोग्राफी टेक्नॉलॉजीने बनवले आहे. ज्यामुळे या फोनच्या बॅक केसिंगवर लाइन पॅटर्न दिसणार आहे. कंपनीने रियलमी सी ३३ फोन प्लास्टिक बॅक केसऐवजी पीसी आणि पीएमएमए मटेरियलचा वापर केला आहे. ज्यामुळे तो बऱ्यापैकी आकर्षक दिसतो. या फोनची बॉडी ८.३ एमएम अल्ट्रा स्लिम आहे.

फोटोग्राफीसाठी :
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये मुख्य कॅमेरा 50 एमपीचा असून या प्रायमरी कॅमेऱ्याला आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा सपोर्ट आहे. याशिवाय नाइट मोड, एचडीआर मोड, टाइमलॅप्स आणि पॅनोरॅमिक व्ह्यू मोड हे देखील सपोर्टेबल आहेत.

5000 एमएएचची बॅटरी :
रियलमी सी ३३ मध्ये ५००० एमएएचची बॅटरी आहे. अल्ट्रा सेव्हिंग मोडमध्ये तुमच्याकडे 15 टक्के बॅटरी असेल तर हा फोन तुम्हाला 1.8 तास कॉलवर बोलायला लावेल. या फोनमध्ये युनिसोक टी ६१२ प्रोसेसर आहे. या फोनमध्ये तुम्हाला आऊट ऑफ बॉक्स अँड्रॉयड 12 ऑपरेटिंग सिस्टम देखील मिळेल. फोनच्या सुरक्षेसाठी साइड फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Realme C33 Smartphone launched check price details 07 September 2022.

हॅशटॅग्स

#Realme C33 Smartphone(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x