16 April 2025 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

Realme Pad X | रियलमीचा जबरदस्त टॅबलेट भारतात लाँच होणार | 11 इंचाचा डिस्प्ले आणि बरंच काही

Realme Pad X

Realme Pad X | रियलमी लवकरच आपला नवा अँड्रॉइड टॅबलेट रियलमी पॅड एक्स भारतात लाँच करणार आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी उपलब्ध असेल. रिअलमी पॅड एक्स अँड्रॉइड टॅबलेट या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. कंपनीनेही भारतात याच्या लाँचिंगला दुजोरा दिला आहे.

5 जी नेटवर्कला सपोर्ट :
रियलमी टॅब 5 जी नेटवर्कला सपोर्ट करेल. हा टॅबलेट प्रीमियम मिड-रेंजमध्ये दिला जाईल आणि त्याची किंमत 25,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे. रियलमी पॅड एक्स इंडियाच्या लाँचिंगची तारीख रियलमीने अद्याप निश्चित केलेली नसली तरी हा अँड्रॉईड टॅबलेट या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होऊ शकतो.

या टॅबचे स्पेसिफिकेशन्स :
रियलमी पॅड एक्स मध्ये 11 इंचाचा आयपीएस एलसीडी असून त्याचे रेझ्युलेशन 2000 x 1200 पिक्सल आहे. याची स्क्रीन डीसी डिमिंगला सपोर्ट करते आणि ४५० निट्सचा पीक ब्राइटनेस आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर देण्यात आला आहे. हा टॅबलेट ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. मायक्रोएसडीच्या माध्यमातून याचे स्टोरेज ५१२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. अँड्रॉइड ११ वर आधारित रियलमी यूआय ३.० वर हे पॅड चालते.

8,340 mAh बॅटरी :
हे यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे ३३ वॉट फास्ट चार्जिंगसह येते. यात ८,३४० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. रिअलमी पॅड एक्सचे वजन सुमारे ४९९ ग्रॅम आहे आणि ते ७.१ मिमी जाडीचे आहे. मागील बाजूस १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. टॅब्लेटमध्ये हाय-रीस ऑडिओ सर्टिफाइड आणि डॉल्बी अॅटमॉससह क्वाड-स्पीकर सेटअप देखील देण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Realme Pad X Android Tab price on Flipkart check details 15 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Realme Pad X Tab(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या