21 February 2025 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल Senior Citizen Savings Scheme | एकदाच गुंतवणूक करा, दर 3 महिन्यात 1,20,000 रुपये मिळतील, योजनेचे फायदे जाणून घ्या Horoscope Today | शनिवार 22 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा शनिवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Redmi Smartphone Offers | 50 एमपी कॅमेरा असलेल्या रेडमी फोनवर मोठी सूट | सोबत युट्युब प्रीमियम मोफत

Redmi Smartphone Offers

Redmi Smartphone Offers | जर तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेडमी नोट 11 तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. कंपनीच्या वेबसाइटवर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनच्या व्हेरियंटची किंमत 15,999 रुपये आहे. यावर कंपनी 1500 रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट देत आहे.

कार्ड पेमेंट इन्स्टंट डिस्काउंट आणि मोफत यू ट्यूब प्रीमियम :
या डिस्काउंटसाठी तुम्हाला एसबीआयच्या कार्डने पैसे मोजावे लागणार आहेत. याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या कार्डाने पेमेंट केल्यास 1250 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. विशेष म्हणजे या फोनच्या खरेदीवर कंपनी यू ट्यूब प्रीमियमची दोन महिन्यांची फ्री मेंबरशिपही देत आहे.

रेडमी नोट 11 ची वैशिष्ट्ये :
कंपनी या फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रेझ्युलेशनसह ६.४३ इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डॉट डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये मिळणाऱ्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज असून टच सॅम्पलिंग रेट १८० हर्ट्ज आहे. कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ४ एक्स रॅम आणि १२८ जीबी पर्यंत यूएफएस २.२ स्टोरेज देण्यात आला आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये तुम्हाला एड्रेनो 610 जीपीयू सोबत स्नॅपड्रॅगन 680 पाहायला मिळणार आहे.

फोटोग्राफीसाठी रियरमध्ये एलईडी फ्लॅशसह ४ कॅमेरे :
फोटोग्राफीसाठी या फोनच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जात आहे.

साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज :
एआय फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ३३ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएस बद्दल बोलायचे झाले तर रेडमीचा हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित एमआययूआय 13 वर काम करतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Redmi Smartphone Offers online purchase check details 05 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Redmi Smartphone Offers(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x