Jio 5G Smartphone २७ हजाराचा | रिलायन्स देणार अवघ्या २५०० रुपयात
मुंबई, १९ ऑक्टोबर : भारतात मोबाइल फोन इंटरनेटची क्रांती घडवून आणणारी कंपनी रिलायन्स जिओने (Jio) 4G नंतर आता 5G मध्ये क्रांती आणण्याची तयारी सुरू केली आहे. लोकांना अगदी कमी किंमतीत म्हणजेच केवळ २५०० ते ३००० रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन जिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या भारतात 5G स्मार्टफोनची (5G smartphone) किंमत २७००० रुपयांपासून सुरू होते. रिलायन्स जिओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी 5G स्मार्टफोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात आणण्याची योजना आखत आहे आणि याच्या विक्रीत वाढ झाल्यास याच्या किंमतीत घट करुन तो २५०० ते ३००० रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिला जाईल. या उपक्रमांतर्गत कंपनी सध्या 2G कनेक्शन वापरत असणाऱ्या २० ते ३० कोटी यूजर्संना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कंपनी जिओच्या या फोनची किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी ठेऊ इच्छिते. जेव्हा आम्ही विक्री वाढवू तेव्हा त्याची किंमत २,५००-३००० रुपये असू शकते. दरम्यान, रिलायन्स जिओने या संदर्भात पाठविलेल्या ईमेलला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
जिओ ही भारतातील यूजर्ससाठी विनामूल्य 4जी मोबाइल फोन बाजारात आणणारी पहिली कंपनी आहे. याअंतर्गत जिओला फोनसाठी 1,500 रुपये द्यावे लागले, जे नंतर परत दिले जाऊ शकतात. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) भारताला 2G मुक्त (2 जी कनेक्शनपासून मुक्त) बनविण्यावर भाष्य केले होते आणि स्वस्त 5G स्मार्टफोन बनविण्याबाबत वक्तव्य केलं होतं.
कंपनी आपल्या 5जी नेटवर्क उपकरणांवर देखील काम करत आहे आणि या उत्पादनांच्या चाचणीसाठी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यास डीओटीला सांगितले आहे. रिलायन्स जिओच्या विनंतीबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सध्या भारतात 5जी सेवा नाही आणि सरकारने 5जी तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी दूरसंचार ऑपरेटरला स्पेक्ट्रमचे वाटप केलेले नाही.
News English Summary: Reliance Jio is planning to launch a 5G smartphone for less than Rs 5,000 and gradually reduce the price to Rs 2,500-3,000 a unit when it scales up the operation, according to a company official. The company will target 200-300 million mobile phone users who use 2G connection at present. “Jio wants to bring the device for less than Rs 5,000. When we scale up the sales, it can be priced in the range of Rs 2,500-3,000,” a company official said on the condition of anonymity.
News English Title: Reliance Jio will offer a 5G smartphone for just rupees 2500 other 5g phone price News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC