17 November 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News SIP Calculator | 5 आणि 10 हजाराच्या SIP ने एकूण 10 वर्षांत किती पैसे जमा होतील, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन - Marathi News
x

Samsung Galaxy A05s | दमदार बॅटरीसह 50 MP कॅमेरा, नवा Samsung Galaxy A05s स्मार्टफोन लाँच होतोय, मिळणार जबरदस्त फीचर्स

Samsung Galaxy A05s

Samsung Galaxy A05s | सणासुदीच्या काळात तुम्ही बजेट रेंजमध्ये सॅमसंग फोनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सॅमसंग A05s हा फोन १८ ऑक्टोबररोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. भारतात येण्यापूर्वी मलेशियात या फोनची विक्री सुरू आहे. भारतीय बाजारपेठेसाठी सॅमसंग A सीरिजच्या नव्या फोनची किंमत अद्याप समोर आलेली नाही. आगामी फोन बजेट रेंजमध्ये येण्याची शक्यता आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
सॅमसंगच्या या नव्या फोनचा डिस्प्ले साइज ६.७ इंच असेल. फुल एचडी+ एलसीडी डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ असेल. यात पंच होल डिझाइन असेल ज्यात फ्रंट कॅमेरा फिट होईल. चांगल्या परफॉर्मन्ससाठी 6 एनएम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट मिळेल. आगामी फोनमध्ये ६ जीबी रॅम असणार आहे. फोटो, व्हिडिओ ठेवण्यासाठी फोनमध्ये १२ जीबीपर्यंत स्टोरेज क्षमतेचा पर्याय असेल.

फोटोग्राफीच्या बाबतीत यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स असेल. नव्या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. दीर्घकालीन वापरासाठी फोनमध्ये ५,००० एमएएचची बॅटरी असेल. ज्यात चार्जिंगसाठी २५ वॉट वायर्ड चार्जिंग सपोर्ट मिळेल. सॅमसंग गॅलेक्सीचा आगामी ए सीरिजचा फोन ब्लॅक, सिल्व्हर, लाइट ग्रीन आणि व्हायोलेट अशा एकूण ४ कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.

नव्या फोनची किंमत?
भारतीय बाजारात येणाऱ्या सॅमसंग गॅलेक्सी A05s फोनची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल. आणखी एका रिपोर्टनुसार या नवीन सॅमसंग गॅलेक्सी ए सीरिजच्या फोनची किंमत 12,999 च्या आसपास असेल. फोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्सनुसार अंदाजित किंमत सांगितली जाते. सॅमसंग गॅलेक्सी ए सीरिजच्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमती अद्याप अधिकृतरित्या समोर आलेल्या नाहीत. लाँचिंगनंतर फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनबाबत गोष्टी स्पष्ट होतील.

News Title : Samsung Galaxy A05s smartphone price in India 15 October 2023.

हॅशटॅग्स

#Samsung Galaxy A05s(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x